महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शरद पवार आजही ठरले महाराष्ट्रात नंबर वन.

80 वर्षांच्या योद्ध्याला भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस.
शरद पवार आजही ठरले महाराष्ट्रात नंबर वन.
March 01, 2021 06:12 PM ago Mumbai, Maharashtra, India

मुंबई: शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली.

यामध्ये आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज (1 मार्च) सोमवारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोव्हिशिल्डची कोरोना लस घेतली.

या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जाते आहे.

लस घेते वेळी पवारांसोबत त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात उपस्थित होत्या. याशिवाय, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते.

प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली.

संबधित बातम्या