महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शहापुर परिसरात मटका व गुटखा जोमात; पोलिसांचे दुर्लक्ष.

शहापुर परिसरात मटका व  गुटखा जोमात; पोलिसांचे दुर्लक्ष.
March 04, 2021 05:19 PM ago Nanded, Maharashtra, India

महाराष्ट्र शासनाची या गुटखा विक्रीस बंदी असतानाही अनेक पानटपरीवर छोट्या मोठ्या दुकानातून या गुटख्याची विक्री सुरूच असल्याचे पहावयास मिळते.

देगलूर (प्र. वसीम शहापूरकर) : देगलूर(नांदेड) तालुक्यातील शहापुर येथे खुलेआम मटका खेळ व गुटखा सुरू असुन संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा अन्न व औषधी प्रशासनाच्या आशीर्वादाने गुटखा तस्करांवर कारवाई करण्याची धमक दाखवत नसल्याचे आरोप नागरिकांतून केला जात आहे.

यापेक्षा गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाची या गुटखा विक्रीस बंदी असतानाही अनेक पानटपरीवर छोट्या मोठ्या दुकानातून या गुटख्याची विक्री सुरूच असल्याचे पहावयास मिळते. शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुण यातुन व्यसनाधीन होत चालल्याचे दिसून येत आहे. तेलगंणा राज्याच्या सिमा लागुन असल्यामुळे तालुक्यात गल्लोगल्लीत मटका चालतो व अवैध गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

त्यामुळे राज्यात गुटखा बंदी असताना देगलूर पोलीस व अन्न औषधी यांच्या कृपा आशीर्वादाने हा गोरख धंदा सुरु असल्याचे दिसत आहे. छोटे छोटे व्यावसायिक, सायकलवर, मोटारसायकलवर प्रत्येक दुकान पानटपरीवर पुरवठा करतात तसेच गावात गुटख्यांचे मोठी साठेबाजी साठेबाज व्यापारी करत असुन ते पानटपरी धारकांना गुटख्याचा पुरवठा करतात. याकडे मात्र पोलिस व अन्न औषध प्रशासनाचे अर्थोअर्थी दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. शहरात मटका खेळ व गुटखा विक्री चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी गुटखा व तंबाखूजन्यपदार्थ खुले आम सुरु आहे. मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने गुटखा विक्री वर बंदी घातली असली तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करत तालुक्यात मुक्तपणे गुटखा विक्री व तस्करी होताना दिसून येते. तालुक्यात ग्रामीण भागात राज्य महामार्गाच्या बाजुला पाणटप-या व धाब्यावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधीत गुटखा विकला जात आहे व मटका खेळला जात आहे.

तालुक्यातील पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा अन्न व औषध प्रशासनाची मेहरनजर या मटका खेळी व गुटखा विक्रेत्यांवर असल्याने बेकायदा विक्री फोफावत चालली आहे. गुटखा बंदीचा कायदा करुन सरकारने गुटखा विक्री तसेच उत्पादन व वाहतुकीवर निर्बंध लादले आहे. उत्पादनावर कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र हे आदेश झुगारून लावत अर्थपूर्ण संबंध गुटखा तस्करांनी तयार करत अशा उत्पादनांची विक्री सुरुच ठेवली आहे.

शासनाने जनहितार्थ मटका खेळ व गुटका बंदी तर केली पण काही भ्रष्ट अधिका-यांनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाला असहकार्य करत असल्यामुळे गुटखा बंदीचा फज्जा उडाला आहे. म्हणुन शासनाने पुर्णपणे गुटखा बंदी कशी होईल या कडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.

संबधित बातम्या