ग्रामपंचायत सरडेवाडीच्या वतीने महिलादिन उत्साहात साजरा
यापुढील काळातसुद्धा महिला सक्षमीकरणासाठी अतिशय प्रभावी पणे काम केले जाणार आहे तसेच महिला बचतगटांसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, तसेच महिलांना साऊ-जिजाऊ, रमाई माता, पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणार - श्रीमती. स्वाती चव्हाण, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सरडेवाडी
सरडेवाडी: सरडेवाडी ता. इंदापुर ग्रामपंचायतीच्या वतीने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १७२ मुलींची खाती काढण्यात आली. पोस्ट विभागाकडून दत्तात्रय पवार, मनोहर चव्हाण पोस्टमन उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने १५० महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये हिमोग्लोबीन, बी.पी., शुगर तपासणी करण्यात आली. तसेच एकूण १५ बचतगटांचा राजमाता अहिल्या महिला ग्रामसंघ स्थापन करण्यात आला. संघाच्या अध्यक्षपदी सौ.सोनाली सिताराम जानकर , सचिवपदी सौ.नकुसा हनुमंत जमदाडे, कोषाध्यक्षपदी सौ.सारिका रविंद्र सरडे, लिपिकापदी सौ.वर्षा नाना तरंगे याची निवड करण्यात आली. व बचतगट गावसमन्वयक ज्योती ज्ञानेश्वर शिद यांची निवड करण्यात आली.
सर्वप्रथम प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन महिला ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रियंका शिद, सौ.वैशाली शिद, श्रीमती सुप्रिया कोळेकर, सौ.गयाबाई तोबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री.सिताराम जानकर हे होते. यावेळी कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डाॅ.सुवर्णा शिंदे, मयुरी लोहार, आयुब तांबोळी, वर्षा तरंगे, ताराबाई सिताफ तसेच सर्व शिक्षक स्टाफचा सन्मान करण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविका, दक्षता ढावरे, अलका ढावरे,छाया कदम, प्रियंका शिंदे, गंगूबाई सिताफ यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सरपंच श्री.सिताराम जानकर म्हणाले की आज ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, गावातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना तसेच महिला बचतगट मेळावा, महिला संघ स्थापना करण्यात आली, यापुढील काळातसुद्धा महिला सक्षमीकरणासाठी अतिशय प्रभावी पणे काम केले जाणार आहे तसेच महिला बचतगटांसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. महिलांना साऊ-जिजाऊ, रमाई माता पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी.
यावेळी आप्पासाहेब माने, सुप्रिया कोळेकर, दिपाली सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. बचतगटांना प्रशिक्षणाबाबत तालुका समन्वयक सौ.राणी ननवरे, अमर कदम, सुयोग सावंत, निलोफर पठाण यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले. यावेळी माजी सरपंच सौ.मोहिनी सरडे, रविंद्र सरडे, प्रशांत सरडे, गणपत जमदाडे, संजय जमदाडे, बळीराम जानकर, अभिमान कोळेकर, विजय शिद, आप्पा माने, नामदेव तोबरे, अमोल जमदाडे उपस्थित होते. आभारप्रदर्शन रविंद्र सरडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिकराव दंडेल, अतुल ढावरे यांनी प्रयत्न केले.
