कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन
माजी खासदार स्वर्गीय शंकररावजी पाटील यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
इंदापूर - प्रतिनिधी (अहमद शेख)
माजी खासदार स्वर्गीय शंकररावजी पाटील यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर परिसरात असणाऱ्या शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, सुरेश मेहेर, बाळासाहेब पाटील, नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम, माजी नगरसेवक शेखर पाटील, रघुनाथ राऊत, यांनी भाऊंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन भाऊंना अभिवादन केले.
इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, गणेश महाजन, बापू जामदार, गोरख शिंदे, अविनाश कोथमिरे, ललेंद्र शिंदे, सचिन जामदार, प्रशांत शेटे, अमित जौंजाळ, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य नागनाथ ढवळे, मुख्याध्यापक विकास फलफले, लहू जाडकर, सुप्रिया आगरकर, फोजिया शेख,आशा सर्जेराव यावेळी उपस्थित होते.
दादासाहेब जावीर सर आणि त्यांच्या सहकारी मित्र व बालचमूंनी भक्ती गीते म्हणून भजन सादर केले. कर्मयोगी परिवारातील सर्व सदस्य तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
