महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

हर्षवर्धन पाटील यांचेकडून वडापुरी येथील जनावरांच्या जळीतग्रस्त गोठ्याची पाहणी

वडापुरी येथील शेतकऱ्याच्या जनावराच्या जळीतग्रस्त गोठ्याची पाहणी करताना हर्षवर्धन पाटील.
हर्षवर्धन पाटील यांचेकडून वडापुरी येथील जनावरांच्या जळीतग्रस्त गोठ्याची पाहणी
March 08, 2021 09:19 PM ago Indapur, Maharashtra, India

4 जनावरांचा मृत्यु

इंदापूर: प्रतिनिधी अहमद शेख

वडापुरी येथील जनावरांच्या जळीतग्रस्त गोठ्याची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.8) सायंकाळी पाहणी केली.

अवसरी रस्त्यावर असलेल्या गोविंद बाळासाहेब निंबाळकर या शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यास रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने गोठा जळून 4 गाई मृत्युमुखी पडल्या तर इतर 3 जनावरे जखमी झाली आहेत.

यावेळी घटनास्थळावरून हर्षवर्धन पाटील यांनी महसूल, वीज मंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करून जनावरे मृत झाल्याने गोविंद निंबाळकर यांना तातडीने शासकीय मदत व सहकार्य करण्याच्या सूचना केल्या, त्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले.

या भेटीप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, राजेंद्र पाटील, बापू चंदनशिवे, धनाजी जाधव, घन:श्याम थोरात, राजेंद्र देवकर, विठ्ठल पिंगळे, निजाम शेख, किशोर फडतरे, उमेश यादव, किरण शिर्के, सुरेश यादव, पशुधन अधिकारी पशुधन अधिकारी डॉ.बी.एस. घुगे व शेतकरी उपस्थित होते.

संबधित बातम्या