भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको
पुजा चव्हाण या दुर्दैवी तरुणीला न्याय मिळावा आणि बलात्कारी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा प्रकरण.
पुजा चव्हाण या दुर्दैवी तरुणीला न्याय मिळावा आणि बलात्कारी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तसेच नांदेड महानगरच्या वतीने शिवाजीनगर उड्डाणपुलावर दोन तास महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, महिला जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.
संजय राठोड यांच्या निषेधाचे फलक व भाजपाचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने महिला व भाजप कार्यकर्ते दाद-याच्या मध्यभागी ठाण मांडून बसले. रस्ता रोको केल्यामुळे उत्तर भागातील वाहने आयटीया पर्यंत तर दक्षिण भागातील वाहने मुथा चौक पर्यंत खोळंबळी होती.

यावेळी आघाडी शासन, संजय राठोड यांच्याविरोधात प्रचंड घोषणा दिल्यामुळे वातावरण दणाणून गेले. यावेळी प्रणिता देवरे, प्रवीण साले, देविदास राठोड, चित्ररेखा गोरे, डॉ. शितल भालके, श्रद्धा चव्हाण यांनी केलेल्या भाषणातून महाराष्ट्र राज्यात महिलावर अत्याचार करणाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करून निषेध व्यक्त केला. यावेळी प्रास्ताविक व संचलन जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले.
रस्ता रोको आंदोलन चालू असताना अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी थोड्यावेळासाठी रस्ता रोको बंद करून रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट करून दिली. रुग्णवाहिका गेल्यानंतर पुन्हा रस्ता रोको सुरू ठेवण्यात आला.
या आंदोलनात दिलीप कंदकुर्ते,मिलिंद देशमुख,महादेवी मठपती, अनिलसिंह हजारी, गंगाधर कावडे, मनोज जाधव,वैजनाथ देशमुख,संजय घोगरे,संतोष परळीकर,सूर्यकांत कदम,अशिष नेरलकर, संतोष क्षिरसागर,अनिल जगताप, कुणाल गजभारे,शंकरराव मनाळकर,अरुण पोफळे,पोर्णिमा बेटमोगरेकर, संगीता झुंजारे,राज यादव, केदार नांदेडकर,अपर्णा चितळे,नलिनी जोशी,साहेबराव गायकवाड,अक्षय अमीलकंठवार, केतकी चौधरी, विशाल शुक्ला,अनिल गाजुला, अनुराधा गिराम, ज्योती कदम,सत्वशीला पांचाळ,वैशाली देबडवार, मंजू स्वामी ,सुप्रिया डोणेकर,संगीता कदम,सोनी मठपती, अलका पाटील, अश्विनी सोनुले, सविता बेटके,श्रीराज चक्रवार,वर्षा चंद्रे,भावना चंद्रे,भाग्यश्री चंद्रे,छाया सोनटक्के,सीमा सुर्वे,वंदना टुमणे,कल्पना गीते, शोभा ठाकूर,रमा लोंढारे,किरण चिंतोरे,अखीला बेग, संगीता साळुंके, छाया केंद्रे,निकिता पांचाळ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. वारंवार आंदोलने करून देखील संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपाच्या वतीने देण्यात आला.
