क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी म.ज्यो. फुले विद्यालयात अभिवादन.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेली कामगिरी अद्वितीय असुन त्यांच्या या कार्यास आजच्या या त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.
सुनिल एन. ठाकरे.
हिंगोली : दि 10
महात्मा ज्योतीरावर फुले विद्यालयात स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रमुख आणि महिला शिक्षणाच्या अग्रदूत खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या आराध्य देवता ज्ञानाई क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांचा पुण्यस्मरण दिन (10मार्च) भावपूर्ण रित्या साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री जयंत काळे सर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक श्री विजयकुमार जटाळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत, क्रीडाशिक्षक श्री गजानन पाटील सर, श्रीमती सोनटक्के मॅडम, सांस्कृतिक विभागाचे श्री विश्वनाथ बोक्से सर, श्री भागवत टार्फे सर, श्री पांडुरंग बोरकर सर, परीक्षा विभाग प्रमुख श्री गांगजी सर, श्री विठ्ठल पिंपरे सर, श्री सोमवंशी सर,श्री नेताजी शिंदे सर श्री संकेत ताटे सर श्री निलेश यादव सर यांचेसह सर्व शिक्षक बांधव आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
अशा या थोर मातेचे विचार समाज जीवनात शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्द आहोत अशी शपथ या प्रसंगी घेऊन माँ सावित्रीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
