महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कोरोना काळात बारामतीतील युवतीची लाख मोलाची मदत.

कोरोना संकटासाठी 25 हजारांचा निधी दिला.
कोरोना काळात बारामतीतील युवतीची लाख मोलाची मदत.
March 15, 2021 08:15 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती: कोरोना मुळे आर्थिक ओढताण होत असताना गेल्या वर्षभर सर्व धार्मिक सण, परंपरा यांना फाटा देत अनेक जण आपआपल्या परीने एकमेकांना मदत करित आहे. अशातच बारामती मधील युवती प्रिया हरिश्चंद्र गवळी या युवतीने आपल्या आजोबांचे प्रथम पुण्यस्मरण साध्या पद्धतीने साजरे करीत उर्वरित 25 हजार रूपयांचा निधी मा.अजित दादा यांच्या कडे कोरोना संकटाच्या निवारणासाठी दिला.

भारतात दरवर्षी सर्व सण, धार्मिक कार्यक्रम, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात आणि यात कित्येकदा पैशांची वारेमाप उधळपट्टी होत असते. पण गेल्या वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वाना पैशाचे महत्व समजु लागले व लोक धार्मिक व ईतर कार्यक्रमांना फाटा देउ लागले किंवा ते साध्यापणाने साजरे करू लागले. हाच आदर्श समोर ठेऊन प्रिया गवळी या युवतीने समाजात आणखी एक आदर्श निर्माण केला. तिच्या याच कार्याचे मा. अजित दादा यांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना प्रिया गवळी म्हणालया, की माझ्या आजोबांनी नेहमीच समाजहित डोळ्यासमोर ठेऊन कार्य केले व आज आमचे समाजात जे काही स्थान आहे ते त्यांच्या मुळेच आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या विचारांना व कार्याला समोर ठेऊन ही मदत करित आहोत.

संबधित बातम्या