महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापूर पोलीस ठाण्यात महिला दिनी एक दिवस महिलाराज

इंदापूर पोलीस ठाण्यात महिला दिनी एक दिवस महिलाराज
March 09, 2021 08:52 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार यांच्या तक्रारी नोंद करण्यासाठी व पोलीस ठाणे कार्यभार पाहण्याकरता महिला पोलीस स्टाफ नेमण्यात आला होता. यावेळी महिला पोलीस कर्मचारी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे यशस्वीपणे पार पाडताना दिसून आल्या. पोलीस ठाण्यात महिलाराज दिसून आले.

महिला पोलीस उपनिरिक्षक सीमा मुंढे , म. पो. शी. कविता माने, म.पो.हवा. शुभांगी खंडागळे, माधुरी लडकत यांनी पोलीस ठाण्यात येणा-या तक्रारी व तक्रारीचे निवारण केले. म.पो.ना. कविता माने या पोलीस ठाणे वायरलेस ड्युटीवर आपले कर्तव्य पार पाडत असताना दिसून आल्या. तर महिला पोलीस शिपाई रेश्मा जगताप या पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार यांच्या तक्रारी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये नोंद करत होत्या.महिला दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचारी एकमेकांचे अभिनंदन केले.

संबधित बातम्या