भरणेमामांचे इंदापुर तालुका दुष्काळामुक्तीचे स्वप्न लवकरच होणार साकार.
इंदापुर तालुका दुष्काळामुक्तीसाठी 249 कोटींचा निधी मंजुर.
विशेष प्रतिनिधी
जंक्शन : इंदापूर तालुका कायमस्वरूपी टॅंकर मुक्त करण्यासाठी तालुक्यातील 143 गावांपैकी 140 गावात हर घर जल योजनेतुन जल जीवन मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागांतर्गत 249 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री अजित दादा पवार व इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते राज्यमंत्री भरणे मामा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये प्रारूप आखाड्यास मान्यता दिली.
या योजनेअंतर्गत जंक्शन साठी 117 लाख तसेच वालचंदनगर साठी 638 लाख इतका निधी मंजुर झाला आहे.
इंदापुर तालुक्याच्या विकासकामांसाठी तालुक्याचे भाग्यविधाते तसेच राज्यमंत्री भरणे मामा नेहमीच तत्पर असतात. इंदापुर तालुक्यासाठी कोरोना काळातही राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही भरणे मामा नेहमीच विकास निधी उपलब्ध करुन दिला. भरणे मामा राज्यमंत्री झाल्यापासुन मामा नेहमीच व्यस्त असतात पण तरीही ते सर्व कामांचा पाठपुरावा करुन काम करुन घेतात.
भरणे मामा मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी पक्षात असल्यापासुन इंदापुर तालुका दुष्काळामुक्त होण्यासाठी प्रयत्न करित होते. गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व मा. अजित दादांच्या नेतृत्वाखाली भरणे मामांची राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी निवड झाली व मामांनी इंदापुर तालुका दुष्काळामुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल सुरु केली व त्याचाच भाग म्हणुन इंदापुर तालुक्यासाठी 249 कोटींचा निधी मंजुर करुन आणला.
