महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

विकास म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे अजित दादा.

अजित दादांनी बारामती मध्ये आज(दि.14) विविध विकासकामांचा शुभारंभ व पाहणी केली.
विकास म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे अजित दादा.
March 14, 2021 05:13 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती : आज (दि.14) दिवसभरात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजित दादा पवार यांनी बारामतीमधील विविध विकास कामांचा शुभारंभ केला.

त्यामध्ये प्रामुख्याने अपर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती, वाहतूक शाखा व बारामती शहर पोलीस स्टेशनच्या (पुणे ग्रामीण) नूतन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ व बारामती पोलीस वसाहत, नूतन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ हे शुभारंभ पार पडले.

आजच्या बारामती दौ-यात मा. अजित दादांनी बारामतीत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तांत्रिक बाबींची माहिती घेतली.

संबधित बातम्या