महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रतिसाद द्यावा - हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली लस
जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रतिसाद द्यावा    -  हर्षवर्धन पाटील    
April 16, 2021 08:53 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : प्रतिनिधी

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी ( दि.15) सकाळी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लस घेतली.

दरम्यान,हर्षवर्धन पाटील यांनी लसीकरणानंतर लस घ्यायला आलेल्या नागरिकांशी संवादही साधला. हर्षवर्धन पाटील म्हणाले, सर्व 45 वर्षाच्या पुढील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली पाहिजे.सरकारने ठरवलेल्या नियमावलीनुसार लसीकरणाला जनतेने प्रतिसाद द्यावा.कोरोना लस सर्वत्र उपलब्ध आहे. मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता, गैरसमज न करता कोरोना लस घेणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.सर्वांनी लसीकरण मोहिमेस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, डॉ. एकनाथ चंदनशिवे,डॉ.अविनाश पानबुडे उपस्थित होते.

संबधित बातम्या