महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

'धक्कादायक' बायो वेस्टेज चा रस्त्याला विळखा.

कोरोना काळात औषधे रस्त्यांवर फेकली.
'धक्कादायक' बायो वेस्टेज चा रस्त्याला विळखा.
5 y 4 m 1 d 11 hrs 28 min 25 sec ago Indapur, Maharashtra, India

हे जर असच सुरू राहिल तर तो कचरा सरळ अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात नेऊन टाकून आंदोलन करणार. - स्थानिक नागरीक

अहमद शेख-

वालचंदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल कचरा वाढला असून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याऐवजी शहराच्या आजुबाजूला तो टाकून दिला जात असल्याचे आढळून येत आहे.

बारामती - अकलूज रोड वर वालचंदनगर रस्त्यावर अनेक ठिकाणी असे वैद्यकीय साहित्य रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी टाकून दिल्याचे आढळून आले आहे. कोरोना संसर्गामुळे सध्या वैद्यकीय कचरा वाढला आहे़ होम आयसोलेशन झालेल्या लोकांचा वैद्यकीय कचरा वेगळा गोळा करण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही.

पीपीई किट, इंजेक्शनच्या सुया, हातमोजे, मास्क याचा वापर वाढला असल्याने त्याचा कचराही मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे़. तसेच Expired अथवा मुदतपुर्व औषधे ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर कुठेही फेकलेली दिसत आहेत.

हा वैद्यकीय कचरा टाकून पर्यावरणाचा -हास केला जात आहे. शहरालगतच्या बाहेर अशा प्रकारे अनेक ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकून दिलेला वेळोवेळी आढळून आला आहे. हा वैद्यकीय कचरा नेमका कोणी टाकला, नगरपालिकेच्या वतीने हॉस्पिटलमधून वैद्यकीय कचरा वेगळ्या वाहनांमार्फत गोळा केला जाऊन तो नगरपालिकेच्या वाहनांमधून हा कचरा आडबाजूला जाऊन फेकून दिला जात आहे का? की हॉस्पिटलमधून हा कचरा फेकला जात आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

या बाबत तेथील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे. हे जर असच सुरू राहिल तर तो कचरा सरळ अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात नेऊन टाकून आंदोलन करणार असल्याची माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. यानंतर तरी किमान अन्न व औषध प्रशासनाला जाग येईल ही अपेक्षा.

संबधित बातम्या