महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

आरोग्य विभागाच्या भरती गैरप्रकार संदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार - स्वप्निल इंगळे पाटील.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस महाराष्ट प्रदेश कार्यकारणी सदस्य इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना दिले निवेदन.
आरोग्य विभागाच्या भरती गैरप्रकार संदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार - स्वप्निल इंगळे पाटील.
April 23, 2021 01:16 PM ago Nanded, Maharashtra, India

नांदेड : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क पदाच्या 28 फेब्रुवारी साठी झालेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य इंजि. स्वप्नील इंगळे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना दिले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क पदाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवड यादीनुसार भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये राज्यभर गोंधळ उडाला होता तर औरंगाबाद भागातील गैरप्रकार घडवून आणणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले होते. आता निवड यादीतील उमेदवारांचे नाव आणि पत्ता बघता बहुतांश उमेदवार परीक्षेत गैरप्रकाराचे प्रकरण उघडकीस आलेल्या परिसरातीलच असल्याचे दिसून येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शंका अधिक बळकट झाली आहे. निवड झालेल्या पहिल्या क्रमांकाच्या काही उमेदवारांना 200 पैकी 198 गुण मिळाल्याचे समोर आले आहे. परीक्षा तज्ञांच्या मते इतके टक्के गुण मिळवणे अशक्य आहे. यामुळे परीक्षेतील गैरप्रकार यामुळेच इतके गुण मिळवता आले असा आरोप विद्यार्थी करत आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क पदासाठी 28 फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेदरम्यान राज्यभरातील परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाल्याने परीक्षा पारदर्शीकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता दोन दिवस आधी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादी वर उमेदवार यांनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाने निवड यादी जाहीर करण्याआधीच उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठवले होते. अन्य उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर सोमवार पासून विविध पदांची निवड यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एका पदासाठी 10 ते 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये एकसूत्रता नसल्याची माहिती आहे. या यादीमध्ये काही उमेदवारांना 198, 196 असे गुण आहेत.

राज्य लोकसेवा आरोग्याच्या अनेक सदस्यांचे म्हणणे असे आहे की 200 पैकी 198 गुण मिळणे शक्य नाही. परीक्षेतील वेळ आणि प्रश्न यांचा कितीही ताळमेळ बसवला तरी इतके गुण मिळवता येत नाही. या आक्षेपांमुळे निवड यादी वादात सापडली आहे. महाराष्ट्रात मागील काही वर्षात अनेक परीक्षेच्या भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याचे व मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारने वरील प्रकाराची तत्काळ चौकशी करावी, अन्यथा या भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या उघडकीसाठी, आम्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल करू, असा इशारा स्वप्निल इंगळे यांनी दिला.

संबधित बातम्या