महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मळद, ता. बारामती येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नुतन इमारतीचा उद्धाटन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न.

बारामतीत 400 कोटी खर्च करून 30 एकर जागेत होणार आयुर्वेदिक महाविद्यालय.
मळद, ता. बारामती येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नुतन इमारतीचा उद्धाटन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न.
August 21, 2021 09:54 AM ago Baramati, Maharashtra, India

मळद, बारामती : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक समारंभाना बंदी होती पण जशी ही बंदी हटवण्यात आली तसा आज (दि. 21) मळद, ता. बारामती येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात वृक्षरोपण करीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नुतन इमारतीचा पहिलाच उद्धाटन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब भाऊ तावरे होते.

तसेच यावेळी जि. प पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आयुष प्रसाद, मा. प्रमोद काकडे सभापती बांधकाम व आरोग्य जि. प पुणे, मा. संभाजी नाना होळकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका, मा. सौ. निता ताई फरांदे, उपसभापती, पंचायत समिती बारामती, जेष्ठ नगरसेवक बानप मा. किरण दादा गुजर, मा. सचिन शेट सातव, मा. विश्वासराव देवकाते, मा. रोहित कोकरे, मा. श्री युवराज देसाई, मा. डॉ. श्री. भगवान पवार, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. भारत नाना गावडे, मा. राहुल काळभोर मा. डॉ. मनोज खोमणे, मा डॉ. सौ. वैशालीताई देवकाते, डॉ. सौ. नीलम पवार, मा. मेहुल शेट गुजर,मा. योगेश बनसोडे, मा. किरण गावडे पाटील तसेच पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष मा. नितीन दादा शेंडे व मळद ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

या दोन मजली आरोग्य उपकेंद्रात प्रतिक्षा कक्ष, अधिकारी कक्ष, आंतररुग्ण विभाग, औषध भांडार विभाग, प्रसूती कक्ष इ. सुविधा उपलब्ध आहे.

यावेळी बोलताना अजित दादा म्हणाले की, सध्या बारामतीचा कोरोना संसर्गाचा दर 4.5% असून जर तो वाढत राहिला तर बारामतीत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, लोकांना सध्या अन्न धान्य पुरवठा चालू आहे, राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला जाईल. शाळा नोव्हेबर च्या पहिल्या आठवड्यात चालू होऊ शकतात. राज्यात शासकीय भरती प्रक्रिया सुरू असून विविध विभागात 18 ते 20 हजार जागा भरण्यास मान्यता दिली आहे.

रुई ग्रामीण रुग्णालयात मोडुलस हॉस्पिटलच्या 100 बेड चे उद्घाटन आज दादांच्या हस्ते होणार आहे. यामुळे लोकांना अजुन चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे दादांनी सांगितले, तसेच आरोग्य सुविधा देताना कामचुकार व हलगर्जीपणा खपवुन घेतला जाणार नाही असाही सज्जड दम त्यांनी दिला.

आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांची जयंती आहे याबद्दल दादांनी अभिवादन करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अजित दादांच्या आजच्या भाषणातील ठळक मुद्दे :

  • 18 रोजी ऑगस्ट रोजी बारामती नगरपरिषदेच्या पाणी पुरवठेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 157 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता.
  • बारामती मार्केट कमिटी साठी 4व कोटी निधीची मान्यता.
  • बारामतीत क्रीडा संकुलच्या वाढीव कामास मान्यता.
  • मळद ग्रामपंचायतीस 6.5 कोटी निधी दिला.
  • आरोग्य उपकेंद्राच्या आवारात वृक्षरोपण.
  • विकास कामे करताना कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही सर्वाना मोबदला व इतर सुविधा दिल्या जातील.
  • लोकांना वेळ देता येत नसल्याची खंत.
  • आरोग्य च्या दर्जेदार सुविधा द्या कामचुकार व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
  • लोकांसाठी केलेल्या कामाचं समाधान लोकांच्या चेहरावर दिसू द्या.
  • आरोग्य कर्मचारी यांच्याशी सौजन्याने वागा, आरोग्य केंद्र संजीवनी ठरेल असे काम करा.
  • 18 वर्षावरील सर्वांनी लसीचे डोस घ्या.
  • सुधाकर नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन वाहिली. 1991 साली त्यांच्या मंत्रिमंडळात दादांना राज्यमंत्री म्हणून संधी.
  • सर्वांच्या दुःखात, संकटात सहभागी, वेळ देता येत नसल्याची खंत.
  • विकास कामे करताना माणुसकीची भावना जपा, गटतट ठेवू नका.

संबधित बातम्या