महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महापुरुषांना खा.चिखलीकर यांच्या सपंर्क कार्यालयात भाजपाच्या वतीने अभिवादन

महापुरुषांना खा.चिखलीकर यांच्या सपंर्क कार्यालयात भाजपाच्या वतीने अभिवादन
1 m 7 hrs 22 min 40 sec ago Nanded, Maharashtra, India

प्रतिनिधी - प्रभाकर पांडे

नांदेड : लिंगायत समाजाचे आराध्यदैवत जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर, ब्राम्हण समाजाचे आराध्यदैवत भगवान परशुराम व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वसंतनगर येथील साई सुभाष या संपर्क कार्यालयात शुक्रवार, दि.14 मे रोजी सकाळी 9.30 वाजता महापुरुषांना कोरोना नियमावलीचे पालन करुन अभिवादन करण्यात आले.

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले.

यावेळी भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपा संघटन सरचिटणीस गंगाधरराव जोशी, मनपा विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, महानगर सरचिटणीस ऍड.दिलीप ठाकूर, मनोज जाधव, मारोती वाडेकर, व्यंकटेश जिंदम, संतोष परळीकर, मारोती वाघ, प्रशांत पळसकर, धीरज स्वामी, आशिष नेरलकर, अभिषेक सौदे, साहेबराव गायकवाड, शततारका पांढरे, महादेवी मठपती, कुणाल गजभारे, रोहित पाटील, सुर्यकांत कदम, राज यादव, संदिप पाटील क-हाळे, अमोल मुनेश्वर, अश्विनी महल्ले, अनुराधा गिराम, लक्ष्मीताई वाघमारे, बालाजी तमकुटे, सुशिलकुमार चव्हाण यांच्यासह अनेकजण उपस्थिती होते

संबधित बातम्या