महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शरीररूपी मंदिरातील अनावश्यक गोष्टींचा नाश करणाऱ्या व्यायामशाळेतील साहित्यांची पूजा करत दसरा सण साजरा.

अंथूर्णे, भरणेवाडी गावातील मॉर्निंग ग्रुप मधील तरुणांकडून दसरा सण साजरा.
शरीररूपी मंदिरातील अनावश्यक गोष्टींचा नाश करणाऱ्या व्यायामशाळेतील साहित्यांची पूजा करत दसरा सण साजरा.
October 15, 2021 11:19 AM ago Indapur, Maharashtra, India

अंथूर्णे, इंदापुर : आज भारतीय संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसरा सणा निमित्त प्रत्येक हिंदूधर्मीय आपापल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीची पूजा करत दसरा सण साजरा करत असतो या दिवशी रामाने रावणाचा वध करत अयोध्येत प्रवेश केला याचं प्रतीक म्हणून दसरा सण साजरा केला जातो, वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणूनही दसरा सण साजरा केला जातो.

आपल्यातील वाईट गुणांचा नाश करत चांगल्या गोष्टींसाठी सिमोल्लंघन करत राहणं हे दसरा या सणाच वैशिष्ट्य याचाच भाग म्हणून आज इंदापूर तालुक्यातील अंथूर्णे व भरणेवाडी गावातील मॉर्निंग ग्रुप मधील तरुणांनी एकत्र येत शरीरातील अनावश्यक असणाऱ्या गोष्टींचा नाश करनाऱ्या जिम साहित्याची पीडीसीसी बँकेचे अधिकारी भारत (बी. एम) साबळे यांच्या हस्ते पूजा करत दसरा सण साजरा केला.

यावेळी महाराष्ट्र सोशल मिडीयाचे मा. सतीश भाऊ साबळे, भाजपचे युवा नेते नानासाहेब गोसावी, प्रसिद्ध उद्योजक गजकुमार गांधी, बाळू जाधव, सागरदादा अवघडे, ओमकार जाधव, पीडीसी बँकेचे संतोष सोनवणे, प्रतीक साबळे, अनिकेत साबळे, परेश दोशी, आकाश साळवे, चैतन्य महेंद्रकुमार दोशी, सौरभ साबळे, चंद्रा टायरचे मालक सहदेव (पप्पू) साबळे आदी उपस्थित होते.

इंदापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भरणे मामा यांच्या प्रयत्नातून अंथूर्णे गावातील तरुणांसाठी आधुनिक जिम उपलब्ध झाली.

यामुळे अंथूर्णे व भरणेवाडी गावाच्या परिसरातील युवकांच्या आरोग्यासाठी या जिमच्या माध्यमातून हातभार लागत आहे यामुळे त्यांनी भरणे मामांचे आभार मानले.

संबधित बातम्या