महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा

विविध सामाजिक उपक्रमांनी ॲड.प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा
May 10, 2021 05:26 PM ago Solapur, Maharashtra, India

टेंभुर्णी, सोलापुर : आज (दि.10) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी (माढा लोकसभा) च्या वतीने सध्याची कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  • टेंभुर्णी मधील दोन्ही covid centre ला भेट देऊन रुग्णांना उकडलेले अंडे व दूध देण्यात आले.
  • covid centre च्या आजूबाजूच्या परिसरात व covid सेंटर मध्ये रुग्णांची, स्टाफ, डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी ची काळजी म्हणून निर्जंतुकीकरण करण्यात आले त्यासाठी sodium hypochlorite देण्यात आले.
  • covid centre मधील रुग्णांना, स्टाफ, डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी ला मास्क व sanitizer वाटप करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल कोविड सेंटरमधील कोविड रूग्णांनी अतिशय समाधान व्यक्त केले.अशाप्रकारे सामाजिक उपक्रम सर्वप्रथम राबवल्याचे रूग्णांमध्ये चर्चा ऐकावयास मिळाली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माढा लोकसभा जिल्हा अध्यक्ष मा. राहुल चव्हाण सर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मा. विशालजी नवगिरे, covid centre चे manager मा. गणेश ननवरे साहेब, covid centre च्या डॉ. चेतना सुरवसे मॅडम,प्रवीण अण्णा वाघमारे, गणेश खरात, तात्यासाहेब सरवदे, अविनाश लोंढे, अजिंक्य प्रक्षाले, जुगल खरात, राम नवगिरे, राजु वाघमारे, योगेश वाघमारे, नितीन कांबळे, किरण कांबळे, सुमित गायकवाड, आरूश सरवदे, संकेत शिंदे, शुभम शिरसाट, सुमित लक्ष्मण खरात, रंजीत गायकवाड, निखिल खरात, दयानंद वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबधित बातम्या