महिला सक्षमीकरण काळाजी गरज; सहायक पोलिस उपनिरीक्षक रतीलाल चौधर
सणसर : समाजात महिलांचं स्थान खूप महत्वाचे आहे महिला सक्षमीकरण झाल्याने समाज विकासाकडे वाटचाल करतो त्यामुळे महिला सक्षमीकरण होणे काळाची गरज आहे असे मत वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांनी सणसर येथे महिला कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी महिला बचत गट, महिलांवरती चे अत्याचार, मुलींचे शिक्षण, महिला उद्योजकता याविषयी मार्गदर्शन करताना मा. चौधर साहेब म्हणाले की महिलांनी चूल आणि मूल यातून बाहेर पडून बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहत मुला-मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा व कुटुंब व समाजातील आपले स्थान मजबूत करा.
पोलीस डिपार्टमेंट महिलांसाठी नेहमी सजग असते त्यांच्या हितासाठी व सक्षमीकरणासाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असेही मत यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी बीपी, शुगर तपासणी करून त्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. तसेच महिला दक्षता समितीची स्थापना केली.
यावेळी सणसर गावातील अनेक महिला, बचत गटाच्या पदाधिकारी, सभासद उपस्थित होत्या.