महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

प्रणितीबाई! अजुन किती अकलेचे तारे तोडणार आहात; वंचितच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचं आमदार प्रणिती शिंदेंना चोख प्रत्युत्तर

 प्रणितीबाई!  अजुन किती अकलेचे तारे तोडणार आहात;  वंचितच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचं आमदार प्रणिती शिंदेंना चोख प्रत्युत्तर
August 15, 2021 09:37 AM ago Solapur, Maharashtra, India

वंचित बहुजन आघाडी देशाच्या राजकारणाला पर्याय व दिशा देऊन मजबुत करणारा पक्ष; आमदार प्रणिती शिंदे यांना वंचित आघाडीचे सडेतोड उत्तर

वंचित हा देशाची फाळणी करणारा पक्ष असे व्यक्तव्य केलेल्या आ. प्रणिती शिंदे यांना वंचित आघाडी सोलापुर जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले.

यावेळी ते म्हणाले की, प्राणिताई तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या लख्ख प्रकाशात अख्खा महाराष्ट्रच न्हाऊन निघतोय की काय! अशी भीती वाटायला लागलीय आता. किव येते हो! तुमच्या वैचारिक आणि बौद्धिक दिवाळखोरीची प्रचंड कीव येते! आद. ॲड प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बहुजन समाजातील वंचित आणि शोषितांना सत्तेचा समान न्याय्य वाटा मिळवुन देण्यासाठी काढलाय !! स्वत:ला सेक्युलर पक्षाच्या प्रतिनिधी म्हणवुन घेणार्‍या तुम्ही, तुम्हाला हे आठवतंय का? की हेच सेक्युलॅरिझम ॲड.प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आजोबांनी संपुर्ण भारत देशाला दिलंय !! तुम्ही ज्या पक्षाच्या आमदार म्हणुन मिरवताय, त्या पक्षाचाच अजेंडा 'फोडा अन् राज्य करा' असा आहे, हे आम्ही सार्‍या जगाला ओरडुन सांगायची गरज नाही.

पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्षतेच्या गोंडस नावाखाली घराणेशाही जोपासणार्‍यांनी अकलेचे तारे न तोडलेलेच बरे!! नाही का ? आपलं वय नसेल इतकी आद. ॲड प्रकाश आंबेडकरांची राजकीय कारकिर्द आणि अनुभव आहे. अरे हो! आता लक्षात आलं! तुमच्या पिताश्रींना लोकसभेच्या निवडणुकीत सलग दुसर्‍यांदा पराभव पत्कारावा लागला. 'काँग्रेसला आता भविष्यच उरलेल नाही' असं खुलेआम चारचौघांत कबुल करावं लागल, याचं वाईट वाटतंय का? आजवर मुस्लीम आणि दलित मतांवरच तर राजकारण केलंत! पण 'आंबेडकर' कायमच जातीअंताची लढाई लढताना दिसतात. लहानातल्या लहान जात समुहाला निवडणुकीच्या उमेदवारीत प्रतिनिधीत्व देवुन त्यांनी ते सिध्दही केलय !! पद, प्रतिष्ठा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठी देशाची फाळणी करणार्‍या तथाकथीत पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवुन घेणार्‍या पक्षाच्या तुम्ही आमदार!! सत्तेत सहभागी होण्यासाठी कुठलीही अभद्र युती करायला सदैव तयार आणि तत्पर असता! तेव्हा सवंग प्रसिद्धीसाठी वंचित आघाडीवर टीका करणं, बंद करा!!

वंचित आणि शोषितांना सत्तेत समान न्याय्य वाटा मिळवून देण्यासाठी बहुजन समाजाला एकत्र आणून प्रस्थापितांसमोर दंड थोपटून उभा राहिलेला आमचा स्वाभिमानी खमक्या नेता आद. प्रकाश आंबेडकर आहे. संपूर्ण महाराष्ट्रासमोर प्रकाश आंबेडकरांनी तिसर्‍या आघाडीचा समर्थ पर्याय ठेवलाय!! आंबेडकरी राजकारणाचा या पक्षाला फायदा होतो, त्या पक्षाला फायदा होतो,असं म्हणण्याचं थोतांड आतातरी बंद करा, कारण संपूर्ण देशाला 'लोकशाही' हे मूल्यच आंबेडकरांनी दिलंय.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याही आधीपासून 'आंबेडकर' सक्रिय राजकारणात होते, याचा बहुधा तुमच्या बालिश बुद्धीला विसर पडला असावा किंवा मग तुम्ही कुठंतरी डोक्यावर तरी पडलेल्या असाव्यात! 'राजकारण' हे फक्त प्रस्थापितांनीच करायचं असतं, 'आमदार', 'खासदारांच्या' मुलांनीच पुढं जाऊन आमदार, खासदार व्हायचं असतं, हा जो स्वयंघोषित, अलिखित पायंडा तुमच्यासारख्या तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्‍या पक्षाच्या प्रतिनिधींनी पाडलाय ना!तो पायंडाच बदलायला आलेत, पुन्हा एकदा 'आंबेडकर' आज जेवढ्या धाडसानं आणि हिरीरीनं तुम्ही बोलताय ना? ते बोलण्याची मुभासुद्धा तुम्हाला 'आंबेडकरांनीच' दिलीय, हे विसरलात का?

'परिवर्तन' हा सृष्टीचा नियम आहे. हे परिवर्तन एका दिवसात किंवा रात्रीत होणार नाही, पण परिवर्तनाच्या प्रक्रियेतील लोकशाहीचा घटक आज वंचित बहुजन आघाडी ठरतेय, हे मात्र नक्की!! वंचित बहुजन आघाडीमुळे अमुक एका पक्षाचं नुकसान झालं, अमुक एका पक्षाचा फायदा झाला असं म्हणण्यापेक्षा आज वंचित आघाडी ही बदलाच्या प्रक्रियेचा महत्वाचा घटक ठरली, हेच सत्य आहे आणि सत्य नेहमीच कटू असतं! तसंच सत्य कधी ओरडूनही सांगत नाही की, मी 'सत्य' आहे, खोटेपणालाच घशाला कोरड पडेपर्यंत ओरडावं लागतं! जसं की तुम्ही आता कोकलताय अगदी बेंबीच्या देठापासून.

राहुल चव्हाण, जिल्हाअध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, सोलापुर पश्चिम

संबधित बातम्या