महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शरद पवारांचा सावलीसारखा सुरक्षारक्षक हरपला..!

शरद पवारांचा सावलीसारखा सुरक्षारक्षक हरपला..!
March 03, 2021 03:40 PM ago Mumbai, Maharashtra, India

मुबंई : शरद पवारांच्या सुरक्षा ताफ्यात मागील २२ वर्षापासून काम करत असलेले पोलीस कर्मचारी महेश तपाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

गेल्या 22 वर्षांपासून महेश तपाडे हे शरद पवार यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात होते. शरद पवारांच्या प्रत्येक दौऱ्यात आणि प्रवासात महेश तपाडे हे कायम सोबत असत. महेश तपाडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

महेश तपाडे हे नाशिक येथील रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. महेश तपाडे यांच्या निधानामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबधित बातम्या