बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मळद गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामचंद्र नाना मदने यांची निवड

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आज रोजी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी गावचे ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रगतशील बागायतदार श्री रामचंद्र निवृत्ती मदने नाना यांची बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्या निवडीचे पत्र श्री मदने यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री बाळासाहेब भाऊ तावरे यांचे शुभहस्ते तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री संभाजी नाना होळकर यांनी दिले.
याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल अध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे, बारामती पंचायत समितीच्या सभापती सौ निताताई फरांदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री मदन नाना देवकाते, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री इम्तियाज भाई शिकलकर, बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप राव जगताप, मार्केट कमिटीचे चेअरमन श्री वसंतराव गावडे, पंचायत समिती सदस्य श्री भारत नाना गावडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री टेंगले, माळेगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री तानाजी कोकरे, बाबुराव चव्हाण, धनवान वदक हे पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ नेते श्री तुकाराम गावडे पाटील, गावचे सरपंच श्री योगेश बनसोडे, श्री लालासाहेब तात्या गावडे पाटील, सुनील काका, सुभेदार राजेंद्र मदने, गणेश जाधव, नाना जाधव, भाऊसाहेब पडळकर, अमोल पवार आधी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीनंतर श्री रामचंद्र नाना मदने यांचा शाल आणि वृक्ष देऊन सर्वांनी सत्कार केला कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला.