महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राधा खुडे ने संपादित केलेले यश अनेकांना प्रेरणादयी ठरेल; भाजप महिला आघाडी मोर्चाच्या शितलताई साबळे यांच्या हस्ते 'सुर नवा ध्यास नवा' फेम राधा खुडे हिचा सन्मान

राधा खुडे ने संपादित केलेले यश अनेकांना प्रेरणादयी ठरेल; भाजप महिला आघाडी मोर्चाच्या शितलताई साबळे यांच्या हस्ते 'सुर नवा ध्यास नवा' फेम राधा खुडे हिचा सन्मान
June 19, 2021 01:04 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : तालुक्यातील वालचंद नगर येथील राधा खुडे हिने नुकत्याच पार पडलेल्या 'सुर नवा ध्यास नवा' या रियालिटी शो मध्ये तिसरा क्रमांक पटकाविला याबद्दल भाजप पुणे जिल्हा महिला आघाडी मोर्चाच्या शितलताई साबळे यांनी तिचे कौतुक केले व तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना शितलताई म्हणाल्या की, प्रतिकुल परिस्थितीत मिळाले यश आयुष्याच्या प्रवासात उपयोगी पडते, राधा खुडे ने संपादित केलेले यश अनेकांना प्रेरणादयी ठरेल.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये चमक असते फक्त त्यांना एका संधीची गरज असते अश्या मुलांना जर समाजाने संधी उपलब्ध करून दिल्या तर ते नक्कीच भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उमठवतील.

संबधित बातम्या