महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कै.शिवलाल हिराचंद बोरा यांचे स्मृतीदिनानिमित्त इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात कोरोणा रुग्णांसाठी पिण्याच्या गरम पाण्यासाठी व्होल्टास मशिन भेट ..

कै.शिवलाल हिराचंद बोरा यांचे स्मृतीदिनानिमित्त  इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात कोरोणा रुग्णांसाठी पिण्याच्या गरम पाण्यासाठी व्होल्टास मशिन भेट ..
April 20, 2021 04:05 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : प्रतिनिधी

कोरोना रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने दोन बहिणींनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयास गरम पाणी करण्याची मशिन (व्होल्टास मशिन) भेट दिली.

दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या जन्मगावी दिलेली भेट ही लाख मोलाची आहे. इंदापूरचे प्रसिद्ध व्यापारी व युवा क्रांती परिवाराचे मार्गदर्शक कै.शिवलाल बोरा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या दोन्ही कन्या सौ.अनिता लोढा व सौ.सुनिता मुथा यांची सामाजिक कार्यकर्ते,नगरसेवक प्रशांत शिताप यांच्याशी चर्चा केली.तहसिलदार अनिल ठोंबरे व उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ चंदनशिवे व डॉ.सुहास शेळके, डॉ. विनोद राजापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांसाठी पिण्याच्या गरम पाण्यासाठी व्होल्टास मशिन बसवण्याची चर्चा करताच अनिता लोढा व सुनिता मुथा यांनी यास तात्काळ प्रतिसाद दिला.व व्होल्टास मशिन भेट दिली. लॉकडाऊन पडलेले असताना सौ.अनिता व सुनिता यांनी पुणे येथून हे मशिन उपलब्ध करून इंदापूरला पाठवून द्यायची सोय केली.याबद्दल प्रशांत शिताफ यांनी आभार मानले. मुलं ही वंशाचा दिवा असतात..पण ती जेव्हा पणती बनते तेव्हा आपल्या आई वडीलांचे संस्कार व दोन्ही घराण्याच नाव उज्वल करते.अनिता व सुनिता या दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनी बाहेरगावी राहुनही आपल्या गावाप्रती आपल्या माणसांप्रती असलेले आपले ऋणानुबंध जपण्याच्या प्रयत्न केला.अशा शब्दात कौतुक करत या माणुसकीच्या कार्याला युवा क्रांती प्रतिष्ठाणचा सलाम असे गौरवोद्गार शिताफ यांनी काढले. या प्रसंगी धरमचंद लोढा,संजय शेठ बोरा बाळासहेब क्षिरसागर,दशरथ भोंग,जवाहरलाल बोरा, सुनिलजी बोरा, महादेव लोखंडे, डॉ.एकनाथ चंदनशिवे,डॉ.सुहास शेळके,डॉ.राजापूरे,तहसिलदार अनिल ठोंबरे उपस्थित होते.

संबधित बातम्या