महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मौजे बावडा येथे कृषी संजीवनी सप्ताह संपन्न

मौजे बावडा येथे कृषी संजीवनी सप्ताह संपन्न
June 25, 2021 10:04 PM ago Indapur, Maharashtra, India

प्रतिनिधी (अहमद शेख)

बावडा - कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त बावडा येथे कृषी विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सोमनाथ मळा येथे ऊस पिकाची सुपर केन नर्सरी पद्धतीने लागवड , आत्मा अंतर्गत ऊस शेतीशाळा यामध्ये शेतकरी निवड, माती परीक्षण, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, उसावरील कीड व रोग याची माहिती देण्यात आली, तसेच मका पिकावरील लष्करी अळी साठी फेरोमोन ट्रॅप शेतकऱ्याच्या शेतावर लावून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, बीबीएफ पद्धतीने पेरणी तसेच बीबीएफ धारकांना बीज प्रक्रियेचे प्रशिक्षण देऊन व जैविक बीजप्रक्रिया साठी अॅझोटोक्टर पीएसबीचा पुरवठा कृषी सेवा केंद्रामार्फत करण्यात आला विकेल ते पिकेल अभियानांतर्गत संत सावतामाळी महिला बचत गट बावडा यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमांमध्ये निवृत्त कृषी पर्यवेक्षक राजेंद्र पिंगळे यांनी बावड्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी उपसरपंच निलेश घोगरे, धैर्यशील पाटील, कृषी मित्र संजय नायकुडे, शांतीलाल दोशी दिलीप मोरे दादासाहेब कांबळे व इतर शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी बावडा गणेश सूर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक कल्याण पांढरे, कृषी सहाय्यक ए.एच कलाल, ए .के.कदम, संदीप घुले राजकुमार शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

संबधित बातम्या