महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

आदिनाथसाठी कुणाचाही बळी दिला जात नाही, जर कुणी स्वतःच्या राजकीय हितासाठी आदिनाथचे राजकारण करू पाहत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही - रश्मी बगल

आदिनाथसाठी कुणाचाही बळी दिला जात नाही, जर कुणी स्वतःच्या राजकीय हितासाठी आदिनाथचे राजकारण करू पाहत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही   - रश्मी बगल
March 31, 2021 10:36 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : विशेष प्रतिनिधी

विरोधकांकडून होत असलेली वारंवार अडवणूक व राजकारणामुळे आज आदिनाथ अडचणींचा सामना करतो आहे.आदिनाथ कारखाना हा तालुक्याची व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांची शान आहे , असे असताना देखील काही मंडळींनी कारखान्याचे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकारण करू पाहत आहेत. आदिनाथ साखर कारखाना २५ वर्षासाठी दुसऱ्यांच्या घश्यात घालण्याचा डाव आहे , दीर्घ काळासाठी कारखाना भाडेतत्वार दिल्यास सभासदाचे मोठे नुकसान होणार आहे, असे मत करमाळ्याच्या आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले .

आदिनाथ वर द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह बँक चे १२८ कोटी रुपयांचे कर्ज असून हे कर्ज फेडण्यासाठी कारखान्याकडून कारखान्याकडे असलेली जवळपास १०० कोटी रुपये रकमेची साखर विकण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला.परंतु विरोधकांनी काही संचालक आणि कर्मचार्यांना हाताशी धरून विक्रीस विरोध करण्यास प्रवृत्त करून वेळोवेळी साखर विक्री थांबवली. असे असताना शिखर बँकेने हे कर्ज फेडण्यासाठी कारखान्याची जप्त केलेली मालमत्ता भाड्याने देणेसाठी दिनांक ०४.१२.२०२० रोजी निविदा जाहिराती द्वारे सर्वात जास्त भाडे देणाऱ्या बारामती अग्रो ला २५ वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचे ठरविले. सदर निर्णय हा बँकेच्या प्रशासकीय समितीने घेतला आहे. त्याला अनेक संचालकांचा विरोध आहे . मात्र तरी देखील हा केवळ राजकीय स्वार्थासाठी सगळं खटाटोप सुरु आहे . आदिनाथ कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी श्री. अमित देशमुख यांना परवानगी मागितली असता त्यांनी ती परवानगी देण्यास असमर्थता दर्शवली त्यांनी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील दि. 14/3/2020 च्या अधिसूचनेनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपययोजनेचा भाग म्हणून परवानगी नाकारली .सहकारी कारखान्यांच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने 31 मार्च आधी घेण्याचा जी. आर. शासनाने जारी केला आहे. हि बाबा सभासदांवर अन्यायकारक आहे .सर्व राजकीय कार्यक्रमाला कोरोना नाही मग याच सभेला राजकीय दबावापोटी कोरोनाचे कारण सांगण्यात आले . कारखाना कुणी चालवायला घेतला ह्यापेक्षा कारखाना सुरू होणे, उसाची बिले वेळेवर मिळणे,कर्मचारी-वाहतूकदार-शेतकरी यांची राहिलेली देणी लवकर मिळणे सध्या अधिक महत्वाचे आहे. यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे कोळगाव धरणामुळे पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे मांगी प्रकल्पातही 100% पाणीसाठा आहे तसेच तालुक्यातील छोटे मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्यामुळे पुढील काळात अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न तालुक्यापुढे उभा राहू शकतो, म्हणून आदिनाथ कारखाना सुरू करणे गरजेचे आहे.

शेतकरी बांधवांची सुद्धा ह्यासाठी वारंवार मागणी होत होती त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील होतो शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीगाठी करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बागल यांनी सांगितले . कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कामगार, ऊसतोड कामगार,ऊस वाहतूकदार आणि उसउत्पादक शेतकरी यांच्या असणाऱ्या अडचणी आता सुटतील.आदिनाथ कारखाना आदर्श पद्धतीने चालवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे सतत होणारे राजकारण बाजूला काढून आदिनाथ कारखाना नियोजन बद्ध पद्धतीने चालवला जाईल.कारखाना सुस्थितीत येईल.मात्र केवळ राजकीय स्वार्थ व सध्या राज्यात असलेली सत्ता याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करून कारखाना बालकवण्याचा आठाहास सुरु आहे . हि या भागातील सभासदावर अन्याय करणारी बाब आहे असेही बागल यांनी स्पष्ट केले .

संबधित बातम्या