महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मा. दत्ता मामा भरणे यांना मातृशोक; दुपारी होणार अंत्यसंस्कार.

तालुक्यातील सर्व जनता मामांच्या या दुःखात सहभागी.
मा. दत्ता मामा भरणे यांना मातृशोक; दुपारी होणार अंत्यसंस्कार.
July 01, 2022 10:11 AM ago Indapur, Maharashtra, India

अंथूर्णे -(ता. इंदापूर ) - राज्याचे माजी राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. दत्ता मामा भरणे यांना आज सकाळी मातृशोक झाला.

मा. दत्ता मामा भरणे यांच्या मातोश्री कै.गिरीजाबाई (जिजी) विठोबा भरणे यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या वरती आज दुपारी ठिक २:०० वाजता भरणेवाडी, ता. इंदापूर जि. पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या जाण्याने तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. दत्ता मामा भरणे यांच्यावरचे मायेचे छत्रच हरपले. परंतु तालुक्याची जनता ज्या प्रकारे मामांवरती प्रेम करते त्या प्रेमामुळे मामांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळेल.

या दुःखद प्रसंगी तालुक्याची सर्व जनता, महाराष्ट्र सोशल मिडीयाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी सहभागी असून मामांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना ईश्वराकडे करीत आहोत.

संबधित बातम्या