महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

आनंदनगर येथे दलित वस्ती रस्ता प्रश्नावर सुरु असलेले वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मागे

गटविकास अधिकारी यांनी रस्त्याच्या कारवाई बाबतचे पत्र दिल्याने उपोषण स्थगित.
आनंदनगर येथे दलित वस्ती रस्ता प्रश्नावर सुरु असलेले वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मागे   
March 13, 2021 11:22 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : सुरेश मिसाळ

इंदापूर तालुक्यातील आनंदनगर येथील दलित वस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा,हि मागणी घेवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.१० मार्च पासून इंदापूर पंचायत समिती च्या गेटमध्ये बेमुदत आंदोलन सुरू केले होते,अखेर या आंदोलनकर्त्यांना दि.१३ रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी कारवाई बाबत पत्र दिल्याने सदरील आंदोलन मागे घेण्यात आले.

आनंदनगर येथील संबधीत रस्त्या संदर्भात प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांनी रस्त्यासाठी अडथळा खुला करण्याबाबत आदेश गटविकास अधिकारी तसेच श्री.मोहोळकर आणि श्री.वाघ यांना दिले असताना देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने यावर तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारित २०१९ नुसार कारवाई करण्यात यावी म्हणून इंदापूर पंचायत समिती समोर बेमुदत आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान इंदापूर पंचायत समिती कडून आंदोलनकर्त्यांच्या पत्रव्यवहारास अनुसरून ग्रामपंचायत आनंदनगर यांना ९ मार्च २०२१ व २० फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीने श्री.मोहोळकर यांना २ नोटिसा २० फेब्रुवारी व १० मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३ अन्वये देण्यात आलेल्या आहेत असे म्हंटले असून प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सदर अतिक्रमण धारकास किमान तीन नोटिसा देणे आवश्यक आहे, तरी सदर नोटीस कालावधी संपल्यानंतर अतिक्रमण न काढल्यास संबंधितांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ अन्वये कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर सदरील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा राणी कोकाटे, माऊली नाचण,प्रमोद चव्हाण,हमीद आत्तार,पवन पवार,अविनाश गायकवाड यांसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबधित बातम्या