महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मी बरी हाय.....माझा बेड त्या बाबांना द्या... असे सांगत रुग्णालयाबाहेर असलेल्या लक्ष्मण राऊत यांना आपला बेड देत अशिक्षित निर्मलाताई ननवरे यांनी जपली माणुसकी...

मी बरी हाय.....माझा बेड त्या बाबांना द्या... असे सांगत रुग्णालयाबाहेर असलेल्या लक्ष्मण राऊत यांना आपला बेड देत अशिक्षित निर्मलाताई ननवरे यांनी जपली माणुसकी...
May 02, 2021 09:07 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : सुरेश मिसाळ

कळंब येथील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कळंब पासून भिगवण ते इंदापूर उपजिल्हा रुग्णालयापर्यंत धावपळ करुनही ऑक्सिजन बेड मिळाले नाही, अखेर उपजिल्हा रुग्णालयातील आलेल्या कळंब गावातील जेष्ठ नागरिक लक्ष्मण राऊत यांना ॲडमिट असणा-या निर्मलाताई ननवरे या महिला रुग्णाने परिस्थिती चे गांभीर्य पाहून रुग्णाच्या नातेवाईकांकडून हकिकत ऐकून डॉ.गायकवाड यांना क्षणाचाही विलंब न करता मी बरी हाय.....माझा बेड त्या बाबांना द्या असे ठणकावून सांगून तिकडची खुर्ची इकडे आणा त्यावर मी आमच्या घरची मला नेयला येईस्तोवर चार वाजेपर्यंत बसते.असे सांगत रुग्णालयाबाहेर असलेल्या लक्ष्मण राऊत यांना आपला बेड दिला.कोरोनाच्या संकटाच्या काळात अशिक्षित निर्मलाताई ननवरे यांनी जी माणुसकी जपणारी भुमिका बजावली तीच भुमिका देशभरातील प्रत्येकाने बजावली तरी कोरोनासारखी हजारो संकटे माणुसकीच्या शक्तिपुढे निश्चितपणे पराभव पत्करतील.

शनिवारी (दि.1) रोजी कळंब गावातील जेष्ठ नागरिक लक्ष्मण राऊत यांना कोरोना आजाराने ऑक्सिजन कमी पडू लागल्याने भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आले.मात्र तेथे बेड शिल्लक नव्हते. हाॅस्पिटलमधिल आरोग्य सेविका सोनिका गांधी यांनी त्यांची तपासणी करून तातडीने ऑक्सिजन बेडसाठी पुढे नेण्यास सांगितले.राऊत कुटुंबीयांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वीय सहाय्यक डॉ.लहू वडापुरे व अंबादास लांडगे यांना फोन केला असता त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधून त्या ठिकाणी बेड उपलब्ध आहे, तुम्ही घेऊन जा असा निरोप राऊत कुटुंबीयांना दिला. पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,भिगवण पोलिस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांनी रूग्णवाहिकेचे चालक पालकर यांना तातडीने रूग्णास नेण्यास सांगितले. पालकर यांनी तत्परता दाखवत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले परंतु तिथे नेईपर्यंत वाढती रूग्णसंख्या पाहून रूग्ण हाॅस्पिटलमध्ये पोहचण्या अगोदरच तो बेड गरजू रूग्णाला दिला होता. कळंब पासून भिगवण ते इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या पायरीपर्यंत धावत आलेल्या राऊत कुटुंबीयांची परवड झाली होती. पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे व डॉ. गायकवाड यांना विनंती केली असता त्यांनी ननवरे यांना चार वाजता डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगून चार वाजता तूम्हाला बेड उपलब्ध होईल असल्याचे सांगितले.

परंतु दुपारचे १२ वाजले होते आणखी चार तास थांबायचे होते.ज्या ऑक्सिजन बेडवरती जिवदान मिळणार होते तो बेड पाहून घ्यावा ही मनात भावना ठेवून राऊत कुटुंबीय तो बेड पाहण्यास गेली असता निर्मलाताई ननवरे यांनी आपल्या बेडवरती भावनिक नजरेने पाहत असलेल्या मंडळींना विचारले तुम्ही माझ्याकडे असे का बघताय...त्यावर उपस्थितांनी त्यांना सर्व हकिकत सांगितली.त्यावर ननवरे यांनी ज्यांना ऑक्सिजन हवा आहे ते बाबा कुठायत असे विचारले असता बाबा बाहेर बसलेले आहेत हे सांगताच निर्मलाताई ननवरे यांनी त्यांना आत घेऊन येण्यास सांगितले व उपस्थित असलेले डॉ.गायकवाड यांना क्षणाचाही विलंब न करता मी बरी हाय.....माझा बेड त्या बाबांना द्या असे ठणकावून सांगून तिकडची खुर्ची इकडे आणा त्यावर मी आमच्या घरची मला नेयला येईस्तोवर चार वाजेपर्यंत बसते.डाॅ.गायकवाड यांनी श्री.राऊत यांना त्या बेडवरती सेट करून ऑक्सिजन सुरू केला आणि राऊत कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकून निर्मलाताई ननवरे यांचे शतशः आभार मानले.

संबधित बातम्या