महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जिल्ह्यात पहिली अटल टींकरिंग लॅब म. ज्यो. फुले विद्यालयात सुसज्ज

ज्योतिषी हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो पण ईथुन वैज्ञानिक घडणार हे मी फुले शाळेतील विद्यार्थ्यांचे चेहरे ओळखून सांगतो. - आमदार मा. श्री. राजू भैया नवघरे (वसमत विधानसभा)
जिल्ह्यात पहिली अटल टींकरिंग लॅब म. ज्यो. फुले विद्यालयात सुसज्ज
September 17, 2022 10:14 PM ago Hingoli, Maharashtra, India

हिंगोली : दि. 17. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्यात मंजूर झालेल्या दोन भव्य अटल लॅब पैकी पहिली अटल टींकरिंग लॅब विद्यालयातील पर्यवेक्षक तथा उपक्रमशील गणितज्ञ श्री तान्हाजीराव जगताप सर यांच्या पुढाकारातून म. ज्यो. फुले विद्यालयात आज सुसज्ज झाली. या प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री अँड मुंजाजीराव जाधव साहेब (माजी आमदार) यांनी भूषविले. तर उद्घाटक म्हणून वसमत विधानसभेचे लाडके युवा आमदार श्रीमान राजु भैय्या नवघरे हे लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर मा. श्री अँड रामचंद्र बागल साहेब (ज्येष्ठ संचालक हू. बहिर्जी शिक्षण संस्था), म ज्यो फुले विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष मा श्री अँड अशोकराव सावंत साहेब, उच्च माध्यमिक शाळा समितीचे अध्यक्ष मा श्री डॉ वसंतराव पतंगे साहेब, हू.बहिर्जी संस्थेचे संचालक मा श्री प्रा अनिल नादरे सर, मा श्री नितीन भाऊ महागावकर, मा श्री अँड राम झुंजूर्डे साहेब, मा श्री प्रल्हादराव सावंत साहेब, यांच्यासह वकिल संघाचे मा श्री अँड तेलगोटे साहेब, मा श्री बाळु मामा ढोरे, स्थानिक शाळा समितीचे सदस्य मा श्री विलासराव भोसकर साहेब, मा श्री बाबुराव वानखेडे साहेब, मा श्री संतोषराव चौधरी, मा श्री गजाननराव पतंगे साहेब, मा. श्री हर्ष लढ्ढा अमरावती,(लॅब गाईड) यांच्यासह मा.श्री शिवाजीराव शिंदे पुयणेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते या भव्य प्रयोगशाळेचे थाटामाटात उद्घाटन पार पडल्यानंतर त्यात मांडलेल्या प्रयोगांची सविस्तर माहिती प्रयोगकर्त्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत समजून सांगितली. सर्व पाहुण्यांनी समाधान व्यक्त करीत संपुर्ण विद्यालयाचे तोंडभरून कौतुक केले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री जयंत काळे सर यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य श्री बी बी देशमुख सर, पर्यवेक्षक श्री तान्हाजीराव जगताप सर आणि पर्यवेक्षक श्री विजयकुमार जटाळे सर व सर्व विज्ञान व गणित शिक्षकांनी सर्व शिक्षकांना सोबत घेऊन केलें होते.

या कार्यक्रमासाठी बहिर्जी महाविद्यालय वसमत येथील प्राध्यापक मंडळी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा पत्रकार बांधव उपस्थित होते. तद्वतच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थिती असली तरी पावसामुळे थोडा व्यत्यय आला असल्याने थोडा हिरमोड झाला असला तरी लवकरच वरुण राजा सुद्धा थांबल्याने परत कार्यक्रमात रंगत आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री जयंत काळे सर यांनी केले.

तर सूत्रसंचालन प्रा. गुलाब भोयर यांनी तर आभारप्रदर्शन श्री चंद्रकांत गरड यांनी केले. संपुर्ण कार्यक्रमाचे छायांकन श्री एस एम मुसळे, श्री गोविंद बंडे यांनी तर वृत्तांकन श्री. सुनिल एन ठाकरे यांनी केले.

संबधित बातम्या