महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महाराष्ट्रात 'डिजीटल इंडियाचे' स्वप्न पूर्ण करणार 'महाराष्ट्र सोशल मिडीया'; आजपासून इंदापुर तालुक्यातुन सुरुवात.

महाराष्ट्रात 'डिजीटल इंडियाचे' स्वप्न पूर्ण करणार 'महाराष्ट्र सोशल मिडीया'; आजपासून इंदापुर तालुक्यातुन सुरुवात.
11 m 1 d 22 hrs 46 min 31 sec ago Indapur, Maharashtra, India

इंदापुर : देशात माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पाहिलेले 'डिजिटल इंडियाचे' मिशन पूर्ण करण्यात आता महाराष्ट्र सोशल मिडीयाने पुढाकार घेण्याचे ठरविले असुन त्याची सुरुवात आज पासून होत आहे.

महाराष्ट्र सोशल मिडीया 'डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया' या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे. महाराष्ट्र सोशल मिडीयाने नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न, प्रशासकीय अडचणी व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यातून नेहमीच सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पाहिलेले 'डिजिटल इंडिया' चे स्वप्न पूर्ण करण्यात आज जरी आपण मागे राहिलो असलो तरी येणाऱ्या काळात महाराष्ट्र सोशल मीडिया या कामावरती पूर्णत:ह लक्ष देऊन असेल व प्रत्येक ग्रामपंचायत डिजिटल करण्याचे काम महाराष्ट्र सोशल मिडीयाचे मार्गदर्शक व अध्यक्ष माननीय सतीश भाऊ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यास सरसावला आहे, याचीच सुरुवात आज दिनांक 25 रोजी इंदापूर तालुक्या पासून केली आहे, त्यासंदर्भात आज पहिली मिटिंग इंदापूर पंचायत समितीचे माननीय गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवकांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी महाराष्ट्र सोशल मिडीया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे यांनी सर्व ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले व 'डिजिटल इंडिया' कशा पद्धतीने करता येईल या विषयी त्यांच्या प्रश्नांना व सूचनांना उत्तरे दिली. सर्व ग्रामपंचायती, डिजिटल करण्यात महाराष्ट्र सोशल मिडीया नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहील असेही सतीश भाऊ साबळे यावेळी म्हणाले.

यावेळी पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी, पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कादबाने उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी 9763626288 यावरती संपर्क साधावा असे आवाहन करीत आहोत.

संबधित बातम्या