महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारक पदी श्री नितीन शेंडे यांची निवड

पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारक पदी श्री नितीन शेंडे यांची निवड
December 01, 2021 10:22 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती: बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष श्री. नितीन वामनराव शेंडे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचारक पदावर नुकतीच निवड झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांनी त्यांची निवड केली आहे.

पार्टीचे महाराष्ट्रात वीस प्रमुख स्टार प्रचारक असून त्यांच्या जोडीला नवीन अभ्यासू कार्यकर्त्यांची टीम देण्यात आली आहे त्यामध्ये सध्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल वर प्रभावीपणे काम करीत असलेले उत्कृष्ट वक्ते श्री नितीन शेंडे यांची ही निवड झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब, खासदार सौ सुप्रिया ताई सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीं सेल चे प्रांताध्यक्ष श्री ईश्वर जी बाळबुधे यांनी ओबीसी सेल वर प्रभावी काम करणाऱ्या आठ कार्यकर्त्यांना या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

संबधित बातम्या