महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जो नेता इंदापूर तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवेल तो आमचा नेता

जो नेता इंदापूर तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवेल तो आमचा नेता
May 22, 2021 11:53 AM ago , Maharashtra, India

इंदापूर : उजनी धरणातील पाणी वापराचे गेल्या १५ वर्षांचे ऑडिट करावे, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली चवरे महराष्ट्र सोशल मिडिया चे अध्यक्ष सतिश साबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. उजनी धरण उभारणीसाठी भरीव योगदान देणाऱ्या इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत असताना, इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विरोधात जाणूनबुजून जनमत तीव्र करण्याचे काम वनमंत्री विभागाचे राज्यमंत्री तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी केले, असा आरोपही चवरे यांनी केला आहे. माऊली चवरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील ६३ हजार एकर शेतीसाठी पाच टीएमसी पाणी उजनीतून उचलून देण्यात यावे, असा निर्णय घेतला होता. १९९५ पासून सातत्याने ही मागणी करण्यात येत होती. वास्तविक पाहता हा निर्णय प्रत्यक्षात यायला चार ते पाच वर्षे लागणार आहेत. असे असताना सोलापूरचे पालकमंत्री असणाऱ्या भरणे यांच्या या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध झाला. इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विरोधात वातावरण तापवले गेले. उजनी धरण उभे राहताना सर्वाधिक विस्थापित इंदापूर येथील आहेत. ५० वर्षे झाली, तरी विस्थापितांना अद्याप न्याय मिळालेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. ११७ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा ६३ टीएमसी इतका प्रचंड आहे. हे पाणी सोलापूर जिल्हा तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग यांची तहान भागविण्यासाठी तसेच भीमा - सिना प्रकल्प, औद्योगिक वसाहती यासाठी वापरले जाते. पुणे तसेच पिंपरी चिंचवड या अफाट लोकसंख्या असलेल्या दोन शहरांसाठी खडकवासला धरण साखळीतील २१ ते २३ टीएमसी इतके पाणी पुरेसे होते. याच पाण्यातून दौंड, इंदापूर, शिरूर तालुक्यातील तलावही भरून घेतले जातात. दौंड तसेच शिरुर तालुक्यातील शेतीसाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी दिले जाते. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील तब्बल ६३ टीएमसी पाणी कुठे जिरते? याचे ऑडिट करणे, गरजेचे झाले आहे. उजनीचा मृत पाणी साठा हा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या साठवण क्षमतेपेक्षा अधिक आहे. असे असताना पुणे जिल्ह्याच्या तुलनेत कमी लोकसंख्या असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील क्षेत्राला ६३ टीएमसी पाणी का पुरत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गेल्या १५ वर्षांचे पाणी वापराचे ऑडिट केले, तर उजनीचे पाणी कुठे जिरते, याचे उत्तर मिळेल, असे माऊली चवरे यांनी म्हटले आहे. पाच टीएमसी पाणी पेटले! इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय सध्या पेटला असून, सोलापूरातील जनता या विरोधात एकवटली आहे. सोलापूरचे पालकमंत्री असणाऱ्या भरणे यांनी हा निर्णय घेताना राजकीय परिपक्वता दाखवणे गरजेचे होते, परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. ज्या इंदापूर तालुक्यातील ३३ गावांनी धरण उभारणीसाठी सर्वस्व दिले, त्याच गावांची उपेक्षा करण्याचे काम राजकीय हेतूने होत आहे.उजनी धरणाच्या पाण्यावर इंदापूर तालुक्यातील शेतकराचा नैसर्गिकपणे हक्क आहे,अशी भावना व्यक्त होत आहे ,

संबधित बातम्या