पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी; राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा केला पराभव.
सोलापुर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला अतिआत्मविश्वास नडला, आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला विजयीही करता आले नाही.

पंढरपूर, सोलापुर : पंढरपूर तालुक्यासाठी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा तीन हजार 716 मतांनी पराभव केला.
मध्यंतरी पंढरपूरचे आमदार कै. भारत भालके यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले यामुळे पंढरपूर तालुक्यात विधानसभा पोटनिवडणूक घ्यावी लागली यामध्ये भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके व भाजपचे समाधान आवताडे यांच्यात जोराची टक्कर होती त्यात आज समाधान आवताडे विजय झाले. यामध्ये परिचर गटाने जोरदार प्रचार करत समाधान आवताडे यांना विजय केले तसेच त्यांना विजयसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील यांनीही मोलाची साथ दिली.
कोरोना काळात महाविकास आघाडीकडून जनतेची झालेली हेळसांड त्यांना चांगलीच भोवलेली दिसते, कोरोना काळात महाविकास आघाडीने शेती पंप कनेक्शन तोडणी, 35 गावचे पाणी प्रश्न, विज बिल माफी, कर्ज माफी आधी प्रश्न न सोडविल्या मुळे जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना नाकारले.
राष्ट्रवादी काँगेसकडून उभे राहिलेले भगिरथ भालके यांच्या संपूर्ण प्रचाराची जबाबदारी सोलापुर जिल्ह्याचे पालक मंत्री तसेच राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे होती पण मध्यंतरी काळात सोलापूर जिल्ह्यात त्यांच्याच घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली होती व त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदावरून हटविण्यात मुख्यमंत्र्यांना निवेदनेही दिली होती पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. कोरोना कळात सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून अक्षम्य असा अपराध केला असे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना वाटत होते तसे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कळवले होते व त्यांच्या जागी नवीन कार्यक्षम पालकमंत्री नेमण्याची त्यांना विनंतीही केली होती, कोरोना काळात सोलापूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना सोलापूरचे पालकमंत्री मात्र पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यस्त होते त्यामुळे कदाचित पंढरपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आतून भाजपाला मदत केली असावी असे या निकालातून वाटते.
मा. दत्ता मामा भरणे नेहमीच काही ना काही गोष्टींमुळे चर्चेत असतात त्यांच्याकडे फारसा मंत्रिपदाचा अनुभव नसला तरी ते अजित दादांच्या खास गोटातले असल्यामुळे त्यांना राज्य वनमंत्री तसेच सोलापूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री पदही मिळाले व पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी त्यांची खास नेमणूकही केली मात्र त्यांना त्यांचे फारसे कर्तुत्व दाखवता आले नाही व त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारावर पराभवाची नामुष्की ओढवली.