महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

गिरिराज हॅास्पिटल बारामतीमध्ये सगळ्यात अध्यावत १२८ Slice सिटी स्कॅन मशिन दाखल.

गिरिराज हॅास्पिटल बारामतीमध्ये सगळ्यात अध्यावत १२८ Slice सिटी स्कॅन मशिन दाखल.
July 12, 2021 09:07 AM ago Baramati, Maharashtra, India

गिरिराज हॅास्पिटल बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादांच्या हस्ते नवीन 128 Slice CT Scan मशीनचा उदघाटन सोहळा संपन्न

बारामती : दिनांक १० जुलै रोजी गिरीराज हॅास्पिटल बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते अध्यावत 128 Slice CT SCAN मशीनचा उद्धाटन सोहळा पार पडला. यावेळी गिरीराज हॅास्पिटलचे चेअरमन डॉ. रमेश भोईटे, सचिव निर्मलाकाकी भोईटे, हॉस्पिटलचे महाव्यवस्थापक प्रशांत भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

ही मशिन कमीत कमी वेळात र्निदोष व स्पष्ट निदान करते. तसेच या मशिनमधून हानिकारक कंपणे कमी निघतात त्यामुळे ही मशिन अधिक सुरक्षित असल्याचे डॉ. रमेश भोईटे यांनी सांगितले. या मशिनमुळे ग्रामीण भागातील लोकांना खूप मोठा फायदा मिळणार आहे.

संबधित बातम्या