महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना 11 एप्रिल 2021व विश्वभूषण,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 14 एप्रिल 2021रोजी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना 11 एप्रिल 2021व विश्वभूषण,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 14 एप्रिल 2021रोजी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
April 11, 2021 10:55 AM ago Indapur, Maharashtra, India

क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना ११ एप्रिल २०२१ रोजी तर विश्वभूषण,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १४ एप्रिल २०२१ रोजी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

या महापुरुषांच्या जयंती निमित्त तमाम बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा!!

फुले,शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र हे भारतीयांचे प्रामुख्याने महाराष्ट्रातील बहुजन जनतेचे घोषवाक्य आहे.महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक वारसा लाभला आहे.या महापुरुषांच्या विचारांमुळे महाराष्ट्राला "पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र" असे संबोधले जाते. या महामानवांनी उपेक्षितांच्या व त्यांच्या न्याय हक्कासाठी अविरत संघर्ष केला आहे .या महापुरुषांचा महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणात मोठ्या प्रमाणावर आवर्जून नामोल्लेख केला जातो.या महापुरुषांच्या विचारधारेमुळेंच आपण बहुजन बांधव घडलो आहोत व घडत आहोत. त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही.

शिव,फुले,शाहु,आंबेडकर या महापुरुषांनी जनकल्याणासाठी आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला, लढा दिला. त्यांनी समाजासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान बहुजन समाज कधीच विसरू शकणार नाही. बहुजन समाज शिक्षित, संस्कारी आणि विकसित व्हावा यासाठी या महापुरुषांनी आयुष्यभर प्रयत्न केले. समाजामध्ये असणारी विषमतेची दरी संपवण्यासाठी खूप प्रयत्न केले. महापुरुषांनी निर्माण केलेला आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे.आपणही या महापुरुषांचे विचार अंगीकृत करण्याची गरज असून त्यानुसार भविष्यात प्रगतीकडे वाटचाल करणे काळाची गरज आहे. या महापुरुषांमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आढळते.गुलामगिरीची बंधने झुगारली, महिलांचा सन्मान करण्यास शिकवले.आदी. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात बहुजन महापुरुषांचे फार मोठे योगदान असून त्यांनी आपल्या हयातीत बहुजन समाजासाठी, राष्ट्रासाठी भरभरून आपले प्रचंड योगदान दिले आहे. महापुरुषांनी मांडलेल्या क्रांतिकारी विचारांमुळे बहुजन समाजात प्रचंड मोठ्या प्रमाणात विचार मंथन घडून आले आहे. महाराष्ट्राची प्रागतिक आणि उदारमतवादी प्रतिमा बहुजन महापुरुषांमुळेच निर्माण झाली आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,असे मला वाटते.काही प्रतिगामी विचारधारेच्या प्रवृत्ती वगळल्या तर आज जो भारत सुजलाम,सुफलाम आणि एकसंघ दिसतो आहे तो या महापुरुषांच्या विचारधारेमुळेच. अधून मधून प्रतिगामी विचारधारेचे लोक या महापुरुषांच्या विचारधारेला छेद देण्याचा प्रयत्न करतात.परंतु या महापुरुषांची विचारधारा एवढी प्रचंड ताकदीने या देशात उभी आहे.त्यापुढे ही प्रतिगामी विचारधारा टिकाव धरू शकत नाही.परंतु प्रतिगामी शक्तीच्या ताब्यामध्ये बहुतांशी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया व शासन , प्रशासनातील भ्रष्ट विचारधारेचे लोक बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवरती आघात करू पाहत आहेत. यापासून बहुजन समाजाने जागरूक राहिले पाहिजे असे मला वाटते. बहुजन महापुरुषांनी केलेले लिखाण आपल्यासाठी फार मोठी देन आहे.त्यांनी केलेले लिखाण ,त्यांची पुस्तकं आपण आवर्जून वाचावीत. त्यांनी दिलेले विचार आपण अंगीकृत/ आत्मसात करून त्यांच्या मौलिक विचारांना अनुसरून भविष्यात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे हीच काळाची गरज आहे.आणि आपण महापुरुषांच्या आचार,विचारांचे अनुकरण केल्यास खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता महात्मा फुले व विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना जयंती निमित्त आदरांजली ठरेल असे मला वाटते.

रत्नाकर मखरे

(माजी नगराध्यक्ष, इंदापूर) अध्यक्ष,मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर जि.पुणे.

संबधित बातम्या