'पाण्याच्या' राजकारणात इंदापुरचा कोरोना गेला वाहुन.
राज्यमंत्र्यांचा निष्काळजीपणा लावतोय जनतेच्या जिवाला घोर

इंदापुरच्या लोकप्रतिनिधींच हे वागणे असेच चालु राहिले तर इंदापुर तालुक्याची तिसऱ्या लाटेत काय परिस्थिती होईल ही कल्पनाही भयावह आहे - सतीश भाऊ साबळे
इंदापुर : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक होत असताना राज्य सरकार सर्वसामान्य लोकांवर कोरोनाचा बाऊ करत लॉकडाउन लादत आहे. यामध्ये सर्वसामान्य गरीब जनता ज्यांना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही व ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांचाही कोणताही विचार होताना दिसत नाही, तरीसुद्धा सर्वसामान्य जनता शासनाच्या या निर्णयाचा आदर करताना दिसून येत आहे पण राजकारणी मात्र आपली राजकारणाची पोळी भाजण्यात व्यस्त आहे याचे उदाहरण म्हणजे पंढरपूर पोट निवडणूक विधानसभा तसेच इंदापुर झालेला शेतकरी मेळावा.
सर्वसामान्य लोकांना पोटापाण्याची चिंता असताना राजकारणी मात्र मेळावे, आंदोलने घेऊन आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोक एकत्र होतात त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लाठीमार करताना दिसून येत आहे पण इंदापूर तालुक्यात नुकत्याच इंदापूरचे आमदार यांनी घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे तसेच ते शासनाच्या जमावबंदी च्या आदेशाची अवहेलना करताना दिसून येत आहे यातुन इंदापूरचे आमदारांना जनतेच्या आरोग्याचे कोणतेही सोयरसुतक नाही हेच यातून दिसून येते.
इंदापुर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोणत्याही सोयी-सुविधा कोविड सेंटरमध्ये देताना दिसून येत नाही याकडे इंदापूरचे आमदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. इंदापुरात कोविड संदर्भात सर्व सामान्य जनतेची खूप मोठी गैरसोय होत आहे. बेडची उपलब्धता, औषधांची कमतरता व परिसरात वाढत असलेली रुग्ण संख्या यावर त्यांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही यातच त्यांना पाणी प्रश्नावरही राजकारण करायचे आहे असे दिसून येत आहे.
उजनीच्या पाणी प्रश्नावरती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतीच प्रतिक्रिया देताना इंदापूर ला पाणी देण्याचा विषय रद्द केला. उजनी धरण जरी सोलापूर जिल्ह्यात असले तरी व सोलापूरचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे इंदापूर चे ही आमदार आहेत असे असतानाही त्यांना हा प्रश्न काही मिटवता आलेला दिसून येत नाही पण इंदापुरात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात ते मात्र इंदापूर तालुक्याचे माजी प्रतिनिधी यांच्या वरच टीका करण्यात धन्यता मानत आहे यावरून त्यांची राजकीय परिपक्वता लक्षात येत आहे.
भरणे मामा दोन निवडणुकांपासून इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत आहे पण त्यांना कोणतीही चमक दाखवता आलेली नाही. इंदापूरचे आमदार नसतेच कोटीच्या कोटी अनुदान आणताना दिसून आले व त्याचा त्यांनी पद्धतशीरपणे गाजावाजा ही केला पण त्यांचे कोणतेही काम दिसून येत नाही म्हणजेच हा सर्व निधी गेला कुठे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळीकडे कोविड सेंटरची उपलब्ध होताना दिसून येत आहे नुकतेच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केलेली पारनेर मतदारसंघातली कोविड सेंटरची शिस्तबद्ध योजना सर्वांच्या मनात भरून घर करून आहे पण त्यांच्याच पक्षाच्या आमदार असलेले दत्ता भरणे हे राज्यमंत्री असून सुद्धा त्यांना त्यांच्या मतदार संघात अशा प्रकारचे कोणतेही उपाय योजना राबवताना दिसून येत नाही यातूनच त्यांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे.
दत्ता मामा भरणे यांच्या आसपास योग्य सल्ला देणाऱ्यांची गर्दी कमी व फुकटचे सल्ले देणाऱ्यांची गर्दी जास्त असे दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी गांधारी सारखी पट्टी बांधलेली वाटते जे डोळस असून सुद्धा त्यांना काही बघावेसे वाटत नाही व त्याचे त्यांना काहीही सोयरसुतक पडलेले नाही असेच चालू राहिले तर त्यांचे राजकीय भवितव्य काय आहे हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज पडणार नाही.