महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापूर तालूक्याचा आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर...

मुदत संपण्यापूर्वीच लाखोंची औषधे फेकली रस्त्यावर...
इंदापूर तालूक्याचा आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर...
March 12, 2021 08:53 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : सुरेश मिसाळ

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर- कळंब जवळील 14 चाळ येथील बी.के.बी.एन रस्त्याच्या कडेला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने लाखो रुपयांची औषधे फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये वापरात असणारी औषधे देखील मुदत संपल्याचे समजून टाकण्यात आलेली आहेत. यामध्ये सिरींज, निडल्स, टॅबलेट, सीरप बॉटल,एनर्जी पावडर इत्यादी अनेक प्रकारची औषधे व टॅबलेट रस्त्याकडेला टाकल्याची आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट यांना सामाजिक कार्यकर्ते घनश्‍याम निंबाळकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून या घटनेची माहिती दिली असता गट विकास अधिकारी परीट म्हणाले की,तुम्ही संबंधित अधिकारी डॉ.प्रशांत महाजन यांना बदनाम करण्यासाठी हा कट रचलेला आहे. यावेळेस पत्रकारांशी बोलताना घनश्याम निंबाळकर म्हणाले की, ही आरोग्य विभागाची औषधे रोड वरती उघड्यावर पडलेली आहेत. जर या ठिकाणी लहान मुले, जनावरे यांच्या खाण्यात औषधे आली तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. औषधांमध्ये केमिकल्स असल्यामुळे पाण्यात मिसळली तर दुर्गंधी पसरून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. या प्रकरणात संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. जर असे झाले नाही तर क्रांतीसुर्य सामाजिक संघटनेकडून अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा क्रांती सूर्य सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते घनश्याम निंबाळकर यांनी दिला.

संबधित बातम्या