महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

१०० वटवृक्षाची लागवड करून कांदलगावात वटपौर्णिमा साजरी

इंदापुरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांची सपत्नीक हजेरी
१०० वटवृक्षाची लागवड करून कांदलगावात वटपौर्णिमा साजरी
June 25, 2021 08:49 PM ago Indapur, Maharashtra, India

कांदलगाव, इंदापुर : कांदलगावात वटपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गावातील सुवासिनी महिलांना वटवृक्षाचे रोप देण्यात आले व महिलांनी त्या वटवृक्षाची लागवड करत ते झाड जगवण्याची लेखी हमीदेखील दिली. सरपंच रविंद्र पाटील व ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमासाठी कांदलगावात इंदापूरचे गटविकास अधिकारी श्री.विजयकुमार परीट यांनी सपत्नीक हजेरी लावली.व त्यांच्या हस्ते गावात वटवृक्षलागवड देखील करण्यात आली. यावेळी बोलताना परिट साहेब म्हणाले की, कांदलगाव ग्रामपंचायत नेहमीच नवनवीन उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते, आज गावात१०० वटवृक्ष लागवड करून वटपौर्णिमा साजरी करून वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, त्यामुळे जैवविविधता संवर्धनास मदतच होईल.

यावेळी माजी जि.प.सदस्या ॠतुजा पाटील, सरपंच रविंद्र पाटील, उपसरपंच तेजमाला बाबर, सदस्या रेखा बाबर, दशरथ बाबर, कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव, उल्हास पाटील, किसन सरडे, बाळू गिरी, विजय सोनवणे, पोलीस पाटील शैलजा पाटील, ग्रामसेविका स्वाती चव्हाण, गावसमन्वयक निलोफर पठाण, लक्ष्मी कसबे तसेच साऊ-जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या.

श्रमदान ग्रुप, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामसेविका रंजना आघाव-हांगे व ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी आजच्या उपक्रमासाठी स्वखर्चाने रोपे उपलब्ध करून दिली.

यावेळी बोलताना सरपंच श्री.पाटील म्हणाले की, आजच्या वटवृक्ष लागवडीमुळे परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालण्यात आला असून कांदलगाव पर्यावरण संतुलित ऑक्सिजन व्हिलेज होण्यास मदत होणार आहे, रोपे उपलब्ध करून देणार्‍या श्रमदान ग्रुपच्या रंजना आघाव व आमच्या गावच्या ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांचे आम्ही आभारी आहोत.

आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष बाबर यांनी प्रयत्न केले.

संबधित बातम्या