महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शिक्षण क्षेत्रातही आता बारामती पॅटर्न दिसू लागला आहे. - श्री. नितीन शेंडे.

शिक्षण क्षेत्रातही आता बारामती पॅटर्न दिसू लागला आहे. - श्री. नितीन शेंडे.
February 20, 2022 10:11 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती : विकासाच्या बाबतीत दूरदृष्टी असणारे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब राज्याचे कार्यक्षम उपमुख्य मंत्री नामदार अजित दादा पवार साहेब व खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या अथक प्रयत्नातून विकासाचा बारामती पॅटर्न जसा बनला आहे त्याच पद्धतीने विकसित बारामतीमध्ये सध्या शिक्षणाचा ही नवीन बारामती पॅटर्न निर्माण होत आहे.. ही समाधानाची बाब आहे, असे उद्गार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन शेंडे यांनी बारामती एमआयडीसी मधील लडकत सायन्स अकॅडमी च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले.

याप्रसंगी डॉक्टर सचिन घोरपडे, प्राचार्य रामचंद्र वाघ सर, पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल लडकत, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री बाबासाहेब चौधर, बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य श्री राजेश जाधव, काराटी गावचे सरपंच श्री. बी. के जाधव सर, इत्यादी मान्यवर तसेच अकॅडमी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक वर्ग याप्रसंगी प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नामदेवराव लडकत सर यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापिका प्राजक्ता मॅडम व सिद्धी मॅडम यांनी केले, सूत्रसंचालन श्री.आशिष कांबळे सर यांनी केले, आभार प्रदर्शन श्री गणेश लडकत सर यांनी केले.

या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे स्मार्ट बोर्ड टिचिंग सुविधा असून विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम आणि अद्ययावत ग्रंथालय आहे.

याप्रसंगी डॉक्टर सचिन घोरपडे श्री अनिल लडकत, श्री. बी. के जाधव यांनीही शुभेच्छा पर भाषण केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक काळे सर, प्राध्यापक माने सर, प्राध्यापक आखाडे सर प्राध्यापक नितीन सर इत्यादींनी परिश्रम घेतले.

संबधित बातम्या