महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जागतिक महिला दिन सायली हिल परिसरात संपन्न

जागतिक महिला दिन सायली हिल परिसरात  संपन्न
March 09, 2022 01:16 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती : 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशातच बारामती शहरातील सायली हिल परिसरातील सर्व महिलांना स्नेहभोजन आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे यांचे प्रबोधनपर मनोगत झाले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रिटायर शाखाधिकारी श्री जगन्नाथ नाळे साहेब यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी माजी नायब तहसीलदार श्री. भोंग साहेब, जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी श्री. मदने साहेब, श्री. बारवकर नाना, उद्योजक श्री. वाघ साहेब, श्री. झगडे साहेब, श्री. राऊत साहेब, श्री. जानकर साहेब आणि त्या परिसरातील अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

8 मार्च हा जन्मदिन असणाऱ्या सौ पुष्पा ताई नाळे यांचा वाढदिवसही यानिमित्ताने साजरा करण्यात आला अशा अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

संबधित बातम्या