महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राज्यवनमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या वाढदिवस व जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधुन 222 वृक्षारोपणांचे आयोजन

राज्यवनमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या वाढदिवस व जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधुन 222 वृक्षारोपणांचे आयोजन
June 05, 2021 08:34 PM ago Indapur, Maharashtra, India

अंथुर्णे, इंदापुर : इंदापूर तालुक्याचे लाडके व लोकप्रिय आमदार तसेच राज्याचे राज्य वन मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून त्यांच्या अंथुर्णे या गावी पालखी मैदान ठिकाणी रविवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 6 वाजता 222 वृक्षारोपण करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रम कोविड प्रतिबंधक नियम पाळून करण्याचे ठरले आहेत. जगात कोविड सारख्या भयंकर महामारीने थैमान घातले असून लोकांच्या आरोग्या वरती परिणाम होत असून त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे यामुळे वृक्षांचे महत्त्व सर्वांनाच पटले असून जास्तीत जास्त जमीन वृक्ष लागवडी खाली येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठीच वृक्ष रोपण करून त्याचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे यामुळे येणाऱ्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन हवेचा पुरवठा सर्वांनाच होईल यामुळे सर्वांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी मदत होईल.

यानिमित्त इंदापूर तालुक्याचे लाडके व लोकप्रिय आमदार सन्मानीय दत्ता भरणे यांनी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आव्हान केले आहे की, कमीत कमी प्रत्येक ग्रामपंचायतीने 222 वृक्षांचे रोपण करून ते जतन करावे यामुळे पर्यावरण वृद्धीत वाढ होऊन सर्वांना शुद्ध हवा मिळेल जेणेकरून त्यांचे आरोग्यमान सुधारेल.

संबधित बातम्या