महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महेश तुपे यांचे जागतिक पत्रकारिता परीक्षेत यश

महेश तुपे यांचे जागतिक पत्रकारिता परीक्षेत यश
May 25, 2021 06:16 PM ago Indapur, Maharashtra, India

जगातील सर्वात मोठी असणाऱ्या रॉयटर्स न्युज एजन्सीच्या पत्रकारिता परीक्षेत शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील महेश चंद्रकांत तुपे यांनी यश मिळवले आहे.

थॉमसन रॉयटर्सच्या मालकीची ही एक आंतरराष्ट्रीय बातमी पुरवणारी संस्था आहे. जगभरात २०० ठिकाणी ही संस्था कार्यरत असून सुमारे २ हजार ५०० पत्रकार आणि ६०० फोटो पत्रकार काम करत आहेत. नामांकित वृत्तवाहिन्यांना बातम्या पुरविण्याचे काम ही संस्था करते. या संस्थेच्या वतीने नुकतीच ऑनलाईन पध्दतीने 'डिजिटल जर्नालिझम' यासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत महेश तुपे सहभागी झाले होते.

यामध्ये डिजिटल जर्नालिझम, नवीन कल्पना, तंत्रज्ञान व तांत्रिक ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम होता. दरम्यान अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत तुपे उत्तीर्ण झालेले आहेत.

संबधित बातम्या