कर्तव्यदक्ष पोलीस अधीकारी रतीलाल आप्पा चौधर साहेब यांची वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे PSI पदी पदोन्नत्ती
वालचंदनगर : येथे उपसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रतीलाल आप्पा चौधर यांची पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती झाली. त्यांनी आजवर अनेक गुन्ह्याच्या तपासात महत्वाची भुमिका बजावली आहे.
रतीलाल चौधर हे पुणे जिल्हा तंटामुक्ती समन्वयक म्हणून सुद्धा कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावे तंटामुक्त झाली आहेत. वालचंदनगर पोलीस हद्दीत कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांची पोलीस विभागातील कामगिरी व आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक सेवेमुळे त्यांना ही पदोन्नती मिळाल्याचे त्यांनी महाराष्ट्र सोशल मिडीयाशी बोलताना सांगितले.
त्यांच्या या पदोन्नती बद्दल महाराष्ट्र सोशल मिडीया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे, प्रभारी अध्यक्ष शिरीष कादबाने, डॉ. प्रकाश आमटे फेम ऍक्टर सुशांत काकडे, ऐक्ट्रेस शलाका गाडे, नाझ सिलेक्शन चे झाकीर अत्तार, डेस्क पार्टनरचे शुभम वाघ, बिगमार्केटयार्ड कंपनीचे अतुल शिंदे, पंचायत समिती चे माजी अधिकारी काळे साहेब यांनी अभिनंदन केले.