महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

पळसदेव शासनाचे मोफत स्वस्त धान्य वितरण कार्यक्रमातंर्गत माळेवाडी, पळसदेव मधील गीता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री हनुमंत (नाना) बनसुडे यांच्या सूचनेनुसार लाभार्थ्यांना घरपोच धान्य वाटप

पळसदेव शासनाचे मोफत स्वस्त धान्य वितरण कार्यक्रमातंर्गत माळेवाडी, पळसदेव मधील गीता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री हनुमंत (नाना) बनसुडे यांच्या सूचनेनुसार  लाभार्थ्यांना घरपोच धान्य वाटप
May 22, 2021 11:41 PM ago Indapur, Maharashtra, India

पळसदेव : येथील ग्रा.पं सदस्य सुभाष बनसुडे व ग्रा.पं सदस्य विशाल बनसुडे यांच्या सहकार्याने माळेवाडी व शिंदेवस्तीतील १२२ लाभार्थ्यांना मे महिन्यातील गहू व तांदूळ एका दिवसात मोफत धान्याचे घरपोच वाटप केले. तालुक्यात घरपोच धान्य पोहोच करणारे हे एकमेव दुकान ठरल्याचा दावा करण्यात येत आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून माळेवाडी व शिंदेवस्ती येथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती. ही खूप मोठी चिंतेची बाब होती. रूग्णांची गरज ओळखून गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) बनसुडे यांनी एल.जी.बनसुडे विद्यालयाच्या ८ वर्ग खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केला.आतापर्यंत येथे सुमारे ७० रूग्णांनी उपचार घेतले. पळसदेव येथील डॉ.सुरज काळे यांनी विलगीकरण कक्षातील रुग्णांना दररोज मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार मोफत केले. तसेच डॉ.अशोक होरणे यांनी ही मोफत वैद्यकीय सेवा दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ जाधवर, कांबळे सिस्टर व अन्य सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच ग्रामपंचायत, तलाठी, पोलीस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

यासाठी येथील अंकुश बनसुडे, धनाजी बनसुडे, सुभाष बनसुडे, विशाल बनसुडे, सुरेश बनसुडे, लक्ष्मण बनसुडे, संदीप शिंदे, नितिन बनसुडे यांनी आर्थिक व वस्तूच्या स्वरूपात मदत केली. कैलास होले यांनी विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी मुक्कामी राहून सर्व रुग्णांना स्वच्छतेचे साहित्य व पाणी पुरवठा केला. ग्रामपंचायत पळसदेव सरपंच व उपसरपंच यांच्या सहकार्याने माळेवाडी येथे खंडू बनसुडे यांच्या स्वतःच्या ट्रॅक्टरने मोफत औषध फवारणी केली.

सध्या कोरोना महामारीमुळे अडचणीत असलेल्या लोकांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे यावेळी हनुमंत बनसुडे यांनी सांगितले. समाजातील प्रत्येकाने पुढे येवून एकमेकांना धीर व मदतीचा हात दिल्यास या संकटातून सुखरूप बाहेर पडणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबधित बातम्या