महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

आदरणीय मा. खासदार, तथा मा.आमदार भाई केशवराव धोंडगे साहेब मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित

आदरणीय मा. खासदार, तथा मा.आमदार भाई केशवराव धोंडगे साहेब मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित
September 28, 2021 09:01 AM ago Nanded, Maharashtra, India

नांदेड कंधार प्रतिनिधी- साईनाथ शिनगारे

औरंगाबाद येथे शतकोत्तर वर्षिय, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व आमदार भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांना अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या लोकशाही न्युज मराठी चॅनेलच्या वतीने लोकशाही मराठवाडा रत्न पुरस्कार 26/09/ 2021 रोजी औरंगाबाद येथे देण्यात आला.

धोंडगे साहेबांनी वयाची शंभरी पार केली आहे, ते प्रकृतीच्या कारणाने कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव श्री शि. मो. ए. सो. कंधारचे अध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य नांदेड मा. प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब यांना सुपूर्द करताना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब व आरोग्यमंत्री मा. श्री. राजेशजी टोपे साहेब व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

यावेळी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष मा.प्रा.डॉ. पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब, हेमंतजी राठोड साहेब, मु.अ. अनिल घारूळे सर, व्ही.जी. चव्हाण सर, प्रा.रामेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती.

संबधित बातम्या