महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा गौरवशाली दिवस - प्राचार्या अनिता साळवे

महिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा गौरवशाली दिवस - प्राचार्या अनिता साळवे
March 09, 2021 09:04 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : विशेष प्रतिनिधी

महिलादिन हा स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा गौरवशाली दिवस आहे,असे प्रतिपादन प्राचार्या अनिता साळवे यांनी केले.

येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे बोलत होत्या.

साळवे म्हणाल्या की, प्रत्येकाच्याच जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुषंगाने महिला दिनाचे विशेष महत्व असल्याने साजरा करण्यात येतो. आपल्या घरातून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात. यावेळी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते बहुजन महामातांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी प्राचार्यांच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा येथोचीत सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास उप प्राचार्या सविता गोफणे,प्रा. रेश्मा झेंडे, मनिषा जगताप- मखरे, अधीक्षक अनिसा मुल्ला, निता भिंगारदिवे- जगताप आदी महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संबधित बातम्या