महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महामानवाला आदरांजली.

कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महामानवाला आदरांजली.
April 14, 2021 05:09 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापुर : ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाळू गिरी, सदस्य किसन सरडे,उल्हास पाटील,विजय सोनवणे,सुवर्णा तुपे, तेजमाला बाबर,रेखा बाबर,कोंडाबाई जाधव,कमल राखुंडे , दशरथ बाबर, निलोफर पठाण, लक्ष्मी कसबे उपस्थित होते.

यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊ-जिजाऊ महिला ग्रामसंघाने अल्प दरात मास्क शिवून ग्रामपंचायतीकडे दिले. मास्कचे वाटप पूर्ण गावात करणार असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली.

यावेळी बोलताना सरपंच श्री.पाटील म्हणाले की,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व नियम पाळून व कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वाटप करून करत आहोत. संविधाननिर्मात्याची जयंती नियम पाळून करणे, ही देखील एकप्रकारे आदरांजलीच आहे. आंबेडकरी विचार जनमाणसांत रूजवण्यासाठी ग्रामपंचायत विविध उपक्रम घेत असते, आजही आम्ही ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. यापुढे सर्वसामान्यांच्या शाश्वत विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.

ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी कागदी पिशवी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप सरपंच श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ओम ग्रामण्ये संस्थेचे सुयोग सावंत उपस्थित होते.

आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.

संबधित बातम्या