महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शेळगांव (गौरी) कोरोना लसीकरनाचे अनुकरण जिल्ह्यातील सर्व गावांनी करावे - खा.प्रतापराव पा.चिखलीकर.

शेळगांव (गौरी) कोरोना लसीकरनाचे अनुकरण जिल्ह्यातील सर्व गावांनी करावे - खा.प्रतापराव पा.चिखलीकर.
April 27, 2021 12:55 PM ago Nanded, Maharashtra, India

नांदेड : जिल्हयातील नायगांव तालुक्यातील आदर्श गांव शेळगांव (गौरी) गावातील जनतेने 100% कोरोना लस घेऊन जिल्ह्यात अव्वल क्रंमाक मिळविला. या गावाचे लसीकरण अनुकरण नांदेड जिल्हातील सर्व ग्रामीण ग्रामपंचायतीने करावे असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी व्यक्त केले.

शेळगांव गौरी येथील व खासदार चिखलीकर याचे कट्टर समर्थक सुनिल रामदासी याच्या वाढदिवसा निमित्ताने फोनवरून शुभेच्छा देऊन शेळगांव गौरी गावाने कोरोना लसीकरण शिबीरात नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रंमाक मिळवल्याबद्दल गावातील जनतेचे कौतुक व अभिनंदन खा.चिखलीकर यानी केले.

शेळगांव (गौरी) या गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, पाणी व्यवस्थापण, शैक्षणिक कार्यातसुद्धा आपले नांव संपूर्ण महाराष्ट्रात कमावलेले आहे. गावातील आनेक तरुण शिक्षणाच्या माध्यमातून आय.एस, वैद्यकिय क्षेत्रात एम.बी.बी.एस, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक सामाजिक, राजकीय क्षेत्रातसुद्धा गावातील तरुण मंडळी मेहनत घेतल्याबद्दलही गावाचे अभिनंदन करण्याचा योग या निमित्ताने आला अशीही भावना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली. कोरोना लस शिबीरात शेळगांव गौरी चा आदर्श नांदेड जिल्हातील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा.

या कोरोना लसीकरणामध्ये मध्ये शेळगांव गावाने प्रथम क्रमांकाचे मान मिळविला त्या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, वैद्यकीय अधिकारी , गावातील शिक्षक, सर्व आजी माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व गावकरी यांचे अभिनंदन खा.चिखलीकर यांनी केले.

संबधित बातम्या