महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

एल. जी. बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत घवघवीत यश.

विद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी निवड.
एल. जी. बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत घवघवीत यश.
March 04, 2021 02:18 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर: पळसदेव येथील एल. जी. बनसुडे या विद्यालयात १ मार्च २०२१ रोजी झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये पळसदेव येथील एल. जी. बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.

या स्पर्धेमध्ये सोहम संतोष कांबळे (राज्यांमध्ये प्रथम क्रमांक), सिद्धार्थ महेश लोळगे (राज्यात द्वितीय क्रमांक), महेश मगर (राज्यात तृतीय क्रमांक) व सागर करे या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक म्हणून सागर बनसुडे व लक्ष्मण गडदे यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले. यावेळी स्कूलचे प्राचार्य सुरज बनसुडे, उपप्राचार्य दत्तात्रय शिंदे, विभाग प्रमुख दिपक वडापूरे, शिक्षक प्रविण मदने, अविनाश लावंड, नवनाथ माळवदकर, सीमा बाराते, बस चालक श्रीपाद शिंदे, गणेश चव्हाण, अमोल मिसाळ, भावेश फासे, सनी कुचेकर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

संबधित बातम्या